शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' फळाचे सेवन केल्यास होतील अनेक आरोग्यदायी फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 4:00 PM

1 / 8
हिवाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. कारण थंडीमध्ये आजार होण्याचा धोका अधिक असतो. परंतु याऐवजी अनेक समस्या उद्बवतात. अशातच थंडीमध्ये सहज मिळणारे आबंट-गोड फळ म्हणजे स्टार फ्रुटचे सेवन करणे या समस्यांवरील उपाय ठरू शकतो.
2 / 8
यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असते. त्याचबरोबर यामध्ये पोटॅशियम, झिंक, कॅल्शिअम आणि फायबरही आढळून येते. याचे सेवन केल्यामुळे आरोग्यविषयी समस्या दूर होतात. जाणून घेऊया थंडीमध्ये स्टार फ्रुट खाण्याचे फायदे...
3 / 8
हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी - स्टार फ्रुटमध्ये असणारे व्हिटॅमिनी बी 9, अॅन्टी- ऑक्सिडंट आणि फोलिक अॅसिड हृदयाचे आजार दूर ठेवण्यासाठी मदत करतं. याव्यतिरिक्त नियमितपणे याचे सेवन केल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
4 / 8
कोंड्यापासून सुटका - थंडीत केसांमध्ये कोंडा होतो. अशातच स्टार फ्रुट आणि बदामाचं तेल एकत्र करून आठवड्यातून दोन वेळा लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते. तसेच केस चमकदार आणि मुलायम होण्यासही मदत होते.
5 / 8
डोळ्यांसाठी फायदेशीर - मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन बी 6 मधील गुणधर्मांमुळे स्टार फ्रुट डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतं. यामुळे डोळ्यांना सूज, वेदना, पाणी येणं आणि डोळ्यांची दृष्टी कमी होणं यांसारख्या समस्या होतात.
6 / 8
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी - पोषक त्तव आणि व्हिटॅमिन सीच्या गुणधर्म असलेल्या स्टार फ्रुटच्या सेवनाने शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत होते. ज्यामुळे शरीरामध्ये एनर्जी लेव्हल वाढण्यासाठीही मदत होते.
7 / 8
वजन कमी करण्यासाठी - जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला स्टार फ्रुटचे सेवन करणे गरजेचे आहे. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पोट लवकर भरल्यासारखे वाटते आणि लगेच भूक लागत नाही. त्यामुळे साहाजिकच तुम्ही थोडे कमी खाल्ले तर त्याचा परिणाम वजन कमी होण्यास मदत होतो.  
8 / 8
पचनशक्ती वाढवण्यासाठी मदत - स्टार फ्रुटमधील फायबर पचनशक्ती चांगली ठेवण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठतेची लक्षणे दूर करते आणि जळजळ, पेटके आणि अतिसार बरा करण्यास मदत करते. त्यामुळे जर तुम्हाला तुमची पचनशक्ती चांगली करायची असेल तर तुम्हाला स्टार फ्रुट खाणे गरजेचे आहे.
टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्न