शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' भाज्यांची साल फेकण्याची चूक करूही नका, फायदे इतके की वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 1:52 PM

1 / 10
बटाट्याच्या सालीमध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखे घटक असतात जे मेटाबॉलिज्म बुस्ट करतात. यामुळे रक्तातील साखरही नियंत्रणात राहते. तुम्ही बटाट्याच्या साली काढुन टाकल्यामुळे तुम्हाला हे पोषकघटक मिळत नाहीत.
2 / 10
काकडीच्या बिया आणि साल अतिशय पौष्टिक आहे. काकडीच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट, अनेक रोगांशी लढण्यासाठी एंजाइम, असतात. म्हणून काकडीतील सर्व पोषक गुणांचा फायदा हवा असेल तर साल न काढता ती फक्त धुवून खावी. काही अभ्यासात आढळले आहे की काकडी मधुमेह रोखण्यास मदत करते. डॉक्टर नेहमीच काकडी खायला सांगतात कारण ती शरीरातील साखर नियंत्रणात ठेवायला मदत करते.
3 / 10
गाजराच्या वेगवेगळ्या थरात बीटा-केरोटीन, तंतुमय पदार्थ, जीवनसत्व के, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंटसारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. गाजर खाणे वजन कमी करण्यास मदत करते. ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे. पण जर त्याची साल काढून टाकली तर मात्र आपण त्यातले तंतुमय पौष्टिक तत्व घालवून टाकतो. म्हणून पूर्ण साल काढण्याऐवजी वरवर थोडं चमच्याने खरवडून घ्या आणि मग खा.
4 / 10
बिटामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. बीट कच्चा खाऊ शकता, त्याचं सूप, ज्युस बनवून तुम्ही पिऊ शकता किंवा कोशिंबिरीत वापरू शकता. बिटामध्ये तंतुमय पदार्थ तर आहेतच सोबत जीवनसत्व बी9, पोटॅशियम, लोह आणि जीवनसत्व सी भरपूर प्रमाणात असतात. हे रक्तप्रवाह आणि रक्तदाब सुधारण्यास मदत करतात. बिटाची सालही खूप आरोग्यदायी आहे. त्यामध्ये पचन सुधारणारे द्रव्य असतात. म्हणून त्याची साल काढायची गरज नाही. बीट स्वच्छ धुवून घ्यावा.
5 / 10
लिंबाच्या सालीत देखील अँटी ऑक्सिडेट्स असते यामुळे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन अधिक चांगल्या रितीने होते.
6 / 10
लिंबाच्या सालीत देखील अँटी ऑक्सिडेट्स असते यामुळे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन अधिक चांगल्या रितीने होते.
7 / 10
भोपळ्याची भाजी करताना याची साल काढू नका. यामध्ये लोह, व्हिटॅमिन ए, पॉटेशियम भरपूर प्रमाणात असते जे आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे असते.
8 / 10
टॉमेटोचा वापर बऱ्याच भाज्यांमध्ये केला जातो. टॉमेटोच्या सालीत भरपूर न्युट्रिशन असतात. त्यामुळे त्या फेकून देण्याची चूक करू नका.
9 / 10
दुधी भोपळा चिरताना आपण त्याचं साल काढतो. परंतु या सालांचा लेप करून त्वचेवर लावल्यास त्यामुळे त्वचा तजेलदार होते.
10 / 10
लसणाच्या साली अस्थमा पेशंटसाठी फायदेशीर असतात. यासाठी लसणाच्या साली वाटून त्यात मध मिसळा आणि खा. अस्थमावर आराम मिळेल.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स