शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्लीप डिवोर्सने काय मिळतात फायदे? जाणून घ्या हा घेण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 3:05 PM

1 / 9
Sleep Divorce Benefits: जर जोडीरामुळे तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्ही स्लीप डिवोर्स घेतला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल डिवोर्स माहीत आहे पण हा स्लीप डिवोर्स काय आहे? तर याने तुमची झोप पूर्ण होईल आणि तुम्हाला अनेक फायदे मिळतील. चला जाणून घेऊ काय आहे स्लीप डिवोर्स आणि काय आहेत याचे फायदे.
2 / 9
जोडीदारामुळे झोपमोड होते? - प्रत्येक व्यक्तीची झोपण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक लाईट चालू करून झोपतात तर काही लोक घोरत झोपतात. तर काही लोकांना फार शांतता हवी असते. पण एका जोडीदाराची झोपण्याची पद्धत दुसऱ्याच्या उलटी असू शकते. सोबत झोपले तर अशा कपल्सची झोप पूर्ण होत नाही. हळूहळू भांडणं होत राहतात.
3 / 9
दोघांना होतात आजार - झोप जर पूर्ण झाली नाही तर शरीरावर प्रेशर वाढतं. या दबावामुळे हळूहळू काम करण्याची क्षमता कमी होते आणि मेंदुपासून हृदयापर्यंत वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. यापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला जोडीदारापासून स्लीप डिवोर्स घ्यावा लागेल.
4 / 9
स्लीप डिवोर्स घेण्याची पद्धत - या ट्रेंडमध्ये तुम्हाला जोडीदारापासून वेगळ्या बेडवर, वेगळ्या रूममध्ये झोपावं लागेल. जेणेकरून एकमेकांच्या झोपण्याच्या सवयी एकमेकांवर प्रभाव टाकू नये. अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिननुसार, एका तृतीयांश अमेरिकन कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या जोडीदारापासून वेगळे झोपतात. ज्यामुळे त्यांना चांगली झोप लागते.
5 / 9
आधी करा हे काम - स्लीप डिवोर्स घेतल्याने तुम्हाला नक्कीच चांगली झोप लागेल आणि आरोग्यही चांगलं होईल. पण याने तुमच्या नात्यावर वाईट परिणामही होऊ शकतो. अशात हे फॉलो करण्याआधी आपल्या जोडीदारासोबत याची चर्चा करा आणि मग दोघांनी हे ठरवा.
6 / 9
वजन होईल कमी - झोप पूर्ण झाली नाही तर मेटाबॉलिज्म स्लो होतं आणि वजन वाढू लागतं. त्यामुळे स्लीप डिवोर्स तुमचं वाढलेलं वजन कमी करण्यात मदत करतो. याने भूक शांत करणारे हॉर्मोन्स वाढतात. ज्यामुळे तुम्ही जास्त खात नाही आणि जास्त वजनही वाढत नाही.
7 / 9
मेंदुचं कामही फास्ट होईल - चांगली झोप घेतल्याने तुमच्या मेंदुचं कामही चांगलं आणि फास्ट होईल. तुमची विचार करण्याची, समजण्याची, प्रोडक्टिविटी, शिकण्याची क्षमता अनेक पटीने वाढेल.
8 / 9
हृदय होईल हेल्दी - झोपेची क्लालिटी खराब झाल्याने हृदयासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. एका शोधानुसार, जर तुम्ही दररोज 1 तास कमी झोप घेत असाल तर हृदयरोगाचा धोका 6 टक्के वाढतो.
9 / 9
स्लीप डिवोर्सचे इतर फायदे - स्लीप डिवोर्समुळे खेळाडूंचा परफॉर्मन्स वाढतो, टाईप 2 डायबिटीसमध्ये आराम मिळतो, डिप्रेशनपासून बचाव होतो, इम्युनिटी वाढते, इमोशनल हेल्थ वाढते आणि बॉडी रिकव्हरी होते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य