शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Health Care: हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोखंडी भांड्यांमध्ये करा स्वयंपाक; पण एक काळजी जरूर घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 5:00 PM

1 / 5
रक्तातील लाल रक्तपेशींत हिमोग्लोबिन नावाचे प्रोटीन असते.ते प्राणवायूचे वाहक आहे. हिमोग्लोबिनची मात्रा कमी असण्याची अनेक कारणं आहेत. लोहाची (आयर्नची) कमतरता असल्यास पंडुरोग- ऍनिमिया होतो.
2 / 5
सामान्य भाषेत, अंगात रक्त कमी आहे, असं म्हटलं जातं. तसे असल्यास थकवा जाणवणे, डोळे पांढरे दिसणे, त्वचा पिवळी दिसणे, हाता-पायात मुंग्या येणे, कधी कधी पायावर सूज येणे, छातीत धडधडणे, चक्कर येणे, सारखी झोप येणे, केस गळणे अशी लक्षणे दिसतात. हिमोग्लोबिनची मात्रा खूप कमी झाल्यास (डेसिलीटर मागे ७-८ ग्रॅमहून कमी) कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर होऊन जीवन-मरणाचा प्रश्न उद्भवू शकतो.
3 / 5
हिमोग्लोबिन सुधारण्यासाठी आहारात बदल सूचवले जातात. जसे की पालक, बीट, गूळ, ब्रोकोली इत्यादी पदार्थ खाणे. पण, जोडीला आपण कोणत्या धातूच्या भांड्यात स्वयंपाक करतो, ती भांडी कशी वापरतो, हेही महत्त्वाचे आहे. लोखंडाची भांडी वापरल्यावर जोरात घासू नये, साबण वापरल्यास तो निघेपर्यंत स्वच्छ विसळावी. लगेचच कोरडी करावी. नंतर कापसावर थोडं तेल घेऊन तो बोळा फिरवावा. याला सिझनिंग करणे म्हणतात.
4 / 5
लोखंडी भांड्यात शिजवलेला पदार्थ फार वेळ तसाच ठेवला तर लाल होतो. लोखंड आणि हवेतील प्राणवायूची प्रक्रिया होऊन आयर्न ऑक्साईड तयार होते. आंबट पदार्थ उदा. टोमॅटो, चिंचं, आमसूल, आवळा लोखंडी पातेल्यात शिजवू नये. त्याने लोखंडावर प्रक्रिया होऊन लोह गरजेपेक्षा जास्त प्रमाणात अन्नात मिसळतं.
5 / 5
कोणत्याही चांगल्या गोष्टीचा अतिरेक केल्यास ते अंगाशी येतं. तसंच सतत लोखंडी भांडी वापरल्याने किंवा लोखंडी पातेल्यात शिजवलेला पदार्थ त्यातच बराच वेळ ठेवून मग खाण्याने लोहाची मात्रा धोकादायक पातळी ओलांडू शकते. आयर्नची विषबाधा होते. म्हणून विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक चांगल्या पद्धतींचा अवलंब करणे इष्ट !
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य