Health Care: Hindering the resolution of a morning walk? Walk at home like this!
Health Care: 'आधीच हौस, त्यात पाऊस'; मॉर्निंग वॉकच्या संकल्पात अडथळा? असा करा घरी वॉक! By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 11:32 AM1 / 8गावचे घर असेल तर घरात, दारात, परसात, अंगणात वॉक घेता येईल, पण शहरातल्या दहा बाय दहाच्या खोलीत कसा काय वॉक करणार, असेही कारण लगेच पुढे करू नका. घरच्या घरी वॉक करायला थोडीशी जागाही पुरते. 2 / 8युट्युबवर 'walk at home' या शीर्षकाखाली अनेक व्हिडीओ आहेत, जे पाहता पाहता आपण जागच्या जागी चालून त्याचे फायदे मिळवू शकतो. हे चालणे साधे चालणे नसून त्यात वेग्वेगळ्या कवायतींचा समावेश असल्याने सर्वांगाचा व्यायाम होतो. 3 / 8कोरोनाच्या काळात जेव्हा सगळे जग चार भिंतींच्या आत अडकले होते, तेव्हा या घरच्या घरी चालण्याच्या पद्धतीचा अवलंब करून लाखो लोकांनी आपला फिटनेस मेंटेन केला. 4 / 8दहा मिनिटांपासून एक तासापर्यंतच्या कालावधीचे व्हिडीओ युट्युबवर उपलब्ध आहेत. आपल्या क्षमतेनुसार आणि वेळेनुसार व्हिडीओ सुरू करून ते पाहता पाहता सोपे व्यायाम प्रकार करत आपल्याला घरच्या घरी न कंटाळता व्यायाम करता येतो. 5 / 8ज्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी मोकळ्या हवेत फिरणे केव्हाही चांगले, मात्र पावसाचे निमित्त करून आपल्या सवयीत खंड पाडण्यापेक्षा होम वॉकिंगचा पर्याय केव्हाही चांगला. मुख्य म्हणजे सर्व वयोगटातले लोक हा व्यायाम सहज करू शकतात. 6 / 8एकदा का या व्यायाम प्रकाराची सवय लावून घेतलीत की अर्ध्या तासात दिवसभराच्या व्यायामाचा कोटा पूर्ण होईल. तुमच्या कामाच्या, ऑफिसच्या, शाळेच्या वेळा सांभाळूनही हा व्यायाम प्रकार सहज करता येईल. 7 / 8व्यायाम करण्याचा नियम असा आहे, की तो आनंदाने केला पाहिजे, बळजबरीने नाही. होम वॉकिंग हा हसत खेळत व्यायाम करण्याचा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे वजन, कोलेस्ट्रॉल तर कमी होईलच शिवाय घाम गाळून केलेल्या परिश्रमामुळे हॅप्पी हॉर्मोन्स रिलीज होतील. 8 / 8तर पावसाची कारणे देणे बंद करा आणि होम वॉकिंगची सुरुवात करून आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी जीवन जगा. आणखी वाचा Subscribe to Notifications