शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'ही' लक्षणं सांगतात शरीरामध्ये आहे Folic Acid ची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 2:53 PM

1 / 7
धावपळीच्या आयुष्यात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आहारात पोषक घटकांचा समावेश असणं गरजेचं आहे. शरीरासाठी फोलिक अ‍ॅसिडची गरज असते. फोलिक अ‍ॅसिडला व्हिटॅमिन बी 9 असं देखील म्हटलं जातं. फोलिक अ‍ॅसिड हे फोलेटचं कृत्रिम रुप आहे.  
2 / 7
शरीरात फोलिक अ‍ॅसिडची कमतरता झाली तर अ‍ॅनीमिया, थकवा, अशक्तपणा जाणवतो. तसेच राग अनावर होतो. अशा समस्यांचा सामना करावा लागत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 
3 / 7
फोलेट काही फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये असतं. तर काही खाद्यपदार्थ तयार करताना फोलिक अ‍ॅसिड वापरलं जातं.  व्हाईट पास्ता, प्रोटीन बार सारख्या अनेक पदार्थांमध्ये फोलिक अ‍ॅसिड असतं.  
4 / 7
फोलिक अ‍ॅसिड हे फोलेटचं कृत्रिम रुप आहे. फोलेटची कमतरता दूर करण्यासाठी फोलिक अ‍ॅसिडचा वापर केला जातो. पालेभाज्या, पपई, डायफ्रूट्समध्ये फोलेट असतं. 
5 / 7
मसूर डाळीमध्ये पोटॅशियमसोबतच फोलट देखील असतं. ब्लडप्रेशरचा त्रास असलेल्या लोकांनी आपल्या आहारात मसूर डाळीचा समावेश करावा. 
6 / 7
गर्भवती महिलांसाठी फोलिक अ‍ॅसिड महत्त्वाचे असते. मात्र याआधी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं गरजेचं आहे. 
7 / 7
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न