शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Heart Disease Risk: ब्लड ग्रुपवरून जाणून घ्या, आपल्याला हार्ट अ‍ॅटॅकचा किती धोका? वेळीच करा सवयीत सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 3:12 PM

1 / 6
बदललेली जीवनशैली आणि खाणपाणाच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांचे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परिणामी त्यांना अनेकवेळा कमी वयातच हृदयविकाराचा सामना करावा लागतो. एवढेच नाही तर यामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. पण, कोणत्या रक्तगटाच्या लोकांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो आणि कोणते लोकं या विकारापासून सुरक्षित असतात, हे आपल्याला माहीत आहे का?
2 / 6
A आणि B ब्लड ग्रुप असलेल्यांना हार्ट अ‍ॅटॅकचा धोका सर्वाधिक - A आणि B ब्लड ग्रुप असलेल्या लोकांमध्ये थ्रोम्बोसिस होण्याचा धोका अधिक असू शकतो, असे वैज्ञानिकांना आढळून आले असल्याचा दावा, अनेक अहवालांत करण्यात आला आहे. रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसिस म्हटले जाते. रक्तवाहिन्यांत रक्ताच्या गाठी झाल्यास हृदयाला रक्त पंप करण्यास अधिक श्रम घ्यावे लागते. यामुळे अनेक प्रकारचे आजारही उद्भवू शकतात.
3 / 6
O ब्लड ग्रुप असलेल्यांना हार्ट अ‍ॅटॅकचा धोका कमी - याशिवाय O ब्लड ग्रुप असलेल्या लोकांन हार्ट अ‍ॅटॅकचा धोका तुलनेने फार कमी असतो. मात्र, या दाव्याची कसल्याही प्रकारची पुष्टी झालेली नाही. यामुळे हा ब्लडग्रुप असलेल्या लोकांनीही आपल्या प्रकृतीकडे योग्य प्रकारे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण, बदलत्या लाइफस्टाइलमुळे शरिरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि हार्ट अ‍ॅटॅक येण्याचा धोका अथवा शक्यता वाढते.
4 / 6
या सवयी लवकरात लवकर बदला - - सर्व प्रथम वेळेवर झोपण्याची आणि वेळेवर उठण्याची सवय लावून घ्या. कारण ही सवय नसेल, तर अनेक आजार आपल्यावर हल्ला करतील.
5 / 6
- याच बरोबर आपल्याला आपल्या खाण्यापिण्यावरही लक्ष ठेवायला हवे. आपण आपल्या खाण-पाणात शक्यतो अशाच भाज्या अथवा फेळे ठेवायला हवीत, ज्यांमुळे हार्टअ‍ॅटॅकचा धोका कमी असेल.
6 / 6
(टीप - येथे देण्यात आलेली माहिती, घरगुती उपाय आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. लोकमत याची पुष्टी करत नाही.) (सर्व फोटो - प्रतिकात्मक)
टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोग