शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 8:37 PM

1 / 6
विमान प्रवासात काही लोकांना टेक-ऑफ आणि लँडिंगच्या वेळी कानाला दडा बसणे किंवा कान दुखण्याची समस्या असते. या प्रकाराला 'Airplane ear' म्हणले जाते. उंची आणि हवेच्या दाबातील बदलांमुळे असे होते. ही समस्या टाळण्यासाठी जाणून घ्या काही टिप्स.
2 / 6
विमान प्रवासादरम्यान झोपायला हरकत नाही. पण टेक-ऑफ आणि लँडिंग दरम्यान झोपल्याने कान दुखण्याची शक्यता असते. अशा वेळी झोप अनावर झाल्यास लँडिंगचा अंदाज घेऊन अलार्म लावावा. म्हणजे, कान दुखणे टाळू शकता.
3 / 6
च्युइंग गम हे विमानात कान दुखणे टाळण्यास मदत करू शकते. टेक-ऑफ आणि लँडिंग दरम्यान च्युइंग गम चघळल्यास कानातील युस्टाचियन ट्यूब उघडणारे स्नायू सक्रिय राहतात. त्यामुळे कान, कानाच्या पडद्यामागील जागा, नाक आणि घशाच्या मागील बाजू अशी गेलेली नलिका कानदुखी टाळण्यास मदत करते.
4 / 6
डिकंजेस्टंट औषध उड्डाण दरम्यान कान दुखणे कमी करण्यास मदत करू शकते. विमान उड्डाणाच्या 30 मिनिटे आधी औषध घ्या, जेणेकरून त्याची सक्रियता विमानात जाणवेल. स्थानिक फार्मसी, किराणा दुकानात किंवा ऑनलाइन ही औषधे खरेदी करता येतात.
5 / 6
इअर प्लग हा विमान प्रवासातील जास्तीचा आवाज रोखण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. हवेतील दाबाचा कानांवर परिणाम होऊ न देणे किंवा समान दाब निर्माण करणे असे इअर प्लगचे काम असते. फ्लाइटमध्ये अस्वस्थता टाळण्यासाठीही हा पर्याय वापरता येतो.
6 / 6
जर तुम्हाला सर्दी किंवा घशाचा संसर्ग झाला असेल तर तुम्ही विमानाचा प्रवास टाळावा. हवेतील दाबाचा फरक तब्येतीवर परिणाम करू शकतो. त्यामुळे पूर्णपणे तंदुरूस्त वाटल्यावरच विमान प्रवास करा.
टॅग्स :airplaneविमानLifestyleलाइफस्टाइलHealth Tipsहेल्थ टिप्स