A health insurance policy that will change from October one; Know, what will be the benefit?
एक ऑक्टोबरपासून बदलणार आरोग्य विमा पॉलिसी; जाणून घ्या, काय होणार फायदा? By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 1:00 PM1 / 10एक ऑक्टोबरपासून हेल्थ इन्शुरन्सचे (Health Insurance) स्वरुप पूर्णपणे बदलणार आहे. एकदा हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी विकली गेली की, विमा कंपनी आपल्या मर्जीने क्लेम रिजेक्ट करू शकणार नाही. बर्याच महत्वाच्या आजारांसाठी पॉलिसी घेतल्यानंतर, वेटिंग पीरियड (प्रतीक्षा कालावधी) सुद्धा कमी होणार आहे. 2 / 10एक ऑक्टोबरनंतर पॉलिसी धारकांना नवीन अधिकार मिळणार आहे. तुम्ही विमा पॉलिसीचा प्रीमियम सलग ८ वर्षे भरला आहे, तर कंपनी कोणत्याही कमतरतेच्या आधारे क्लेम रिजेक्ट करू शकणार नाही. 3 / 10हेल्थ कव्हरमध्ये जास्तीत-जास्त आजारांसाठी उपचाराचे क्लेम मिळणार आहेत. मात्र, याचा परिणाम प्रीमियम दरांमध्ये वाढ म्हणून देखील दिसून येऊ शकतो.4 / 10पहिल्यांदा हा अधिकार मिळणार - एकापेक्षा जास्त कंपनीची पॉलिसी असल्यास, ग्राहकाजवळ क्लेम निवडण्याचा अधिकार असेल. एका पॉलिसीच्या मर्यादेनंतर, उर्वरित क्लेम दुसर्या कंपनीकडून शक्य होईल. 5 / 10डिडक्शन झालेल्या क्लेमला दुसर्या कंपनीकडून घेण्याचा हक्क देखील असेल. ३० दिवसांमध्ये क्लेम स्वीकारणे किंवा नाकारणे आवश्यक आहे. एक कंपनीच्या प्रोडक्टमध्ये मायग्रेशन तर जुना वेटिंग पीरियड जोडेल. टेलिमेडिसिनचा खर्च देखील या क्लेमचा भाग असेल.6 / 10उपचार करण्यापूर्वी आणि नंतर टेलिमेडिसिनचा वापर पॉलिसीमध्ये समाविष्ट केला जाईल. ओपीडी कव्हरेज असलेल्या पॉलिसीमध्ये टेलिमेडिसीनची संपूर्ण किंमत उपलब्ध असेल. डॉक्टरांना टेलिमेडिसिन वापरण्याचा सल्ला देण्यात येईल. कंपन्यांना मंजुरी घ्यावी लागणार नाही, वर्षाला मर्यादित नियम लागू होतील.7 / 10सर्व कंपन्यांमध्ये कव्हरच्या बाहेरील कायमस्वरुपी आजार एकसारखेच असतात. कव्हरच्या बाहेरील कायमस्वरुपी आजारांची संख्या कमी होऊन १७ राहील. सध्या कोणत्याही पॉलिसीमध्ये एक्सक्लूजन १० आहे, तर १७ झाल्यानंतर प्रीमियम कमी होईल.8 / 10 मानसिक, अनुवांशिक आजार, न्यूरो-संबंधित गंभीर आजारांवर कव्हर मिळणार आहे. न्यूरो डिसऑर्डर, ओरल केमोथेरपी, रोबोटिक सर्जरी, स्टेम सेल थेरपीचे कव्हरदेखील उपलब्ध असणार आहे.9 / 10आधीच्या आजाराच्या अटींविषयीचे नियम बदलले - पॉलिसी जाहीर झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत लक्षणावर प्री-एग्जिस्टिंग आजार मानला जाईल. प्रीमियमनंतर ८ वर्षांसाठी क्लेम नाकारला जाणार नाही. ८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसीचा कोणताही पुनर्विचार लागू होणार नाही. ८ वर्षांपर्यंत नूतनीकरण चुकीच्या माहितीसाठी निमित्त ठरणार नाही.10 / 10क्लेममध्ये फार्मसी, इम्प्लांट आणि डायग्नोस्टिकशी संबंधित संपूर्ण खर्च मिळेल. असोसिएट मेडिकल खर्चात वाढ झाल्यामुळे क्लेमची रक्कम कमी होते. निश्चित मर्यादेपेक्षा जास्त रुम पॅकेजमध्ये असोसिएट मेडिकल खर्चावरील क्लेम कपात केली जातो. क्लेममध्ये आयसीयू रकमेच्या प्रमाणातही कोणतीही कपात केली जाणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications