शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Health: 'कबुतर जा जा जा...' कबुतरांच्या उच्छादाने मुंबईकर हैराण; वाढले आजाराचे प्रमाण!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 3:33 PM

1 / 9
कबुतरांना शांतिदूत म्हणतात हा समज चुकीचा. शांतिदूत कबुतरे नसून त्यांचे जातभाई पारवे यांना शांतिदूतांची म्हटले जाते. मग प्रश्न पडतो या उपद्रवी कबुतरांची सृष्टिचक्रात नेमकी भूमिका तरी काय? त्यांना आळा घालण्याचे उपाय कोणते? वाचा.
2 / 9
कबुतरांना उडणारे सैनिक, निरोप वाहक म्हटले जाते. पूर्वीच्या काळी त्यांना विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण दिले असता, ते पत्र, संदेश अचूक ठिकाणी पोहोचवत असत. मैने प्यार किया चित्रपटातले 'कबुतर जा जा जा' हे गाणे आपल्या परिचयाचे आहेच! मात्र जैवविविधतेत कबुतरांचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत.
3 / 9
कबुतर आपल्या चोचीने कचऱ्याचे विघटन करते. परदेशात कबुतराचे मांस खनिज स्रोत म्हणून पाहिले जाते. कबुतराच्या विष्ठेद्वारे बीजांकुरण घडते. त्यांना निसर्गतः इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी जाणवतात. अशा ठिकाणापासून बचाव करण्यासाठी ते तिथून पलायन करतात. या लहरींचा वेध घेण्यासाठी कबुतरांचा वापरक केला जातो. असे सगळे असूनही कबुतरांना निरोप घेऊन नव्हे तर हाकलण्याच्या दृष्टीने ''जा जा'' म्हणण्याची वेळ का आली आहे? तर...
4 / 9
कबुतरांच्या विष्ठेमुळे, राइनायटिस, त्वचेची ऍलर्जी, डोळे लाल होणं, सायनसायटिस यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. श्वसनाचे विकार जडतात. सर्दी पडसे दीर्घकाळ टिकते. फुप्फुसांना सूज येते. ज्यांची रोग प्रतिकारक्षमता कमी असते, त्यांना फुप्फुसाचा संसर्ग लवकर होतो
5 / 9
कबुतरांची विष्ठा आणि पंख श्वसनाच्या आजारांना कारणीभूत आहेत. कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस बुरशी आढळून येते. यामुळे ऍर्लजी होऊ शकते, अस्थमा देखील होण्याची शक्यता असते. मुंबई हवेत आद्रता जास्त असल्याने आणि कबुतरांची संख्या खूप असल्याने कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आजारांचे रुग्ण आढळून येतात. कबुतरांच्या विष्ठेमुळे लोकांना अस्थमाचा जास्त त्रास होतो. त्यावर पुढील पद्धतीने आळा घाला.
6 / 9
दुपारच्यावेळी झोपमोड करणे हे कबुतरांचे अतिशय आवडते काम. त्यांची गुटर्गु ऐकू येऊ नये किंवा त्यांच्या पंखांमुळे आपल्याला श्वसनाचे त्रास होऊ नयेत म्हणून बाजारात मिळणारी बारीक जाळी खिडकीला लावा. तसेच खिडकीबाहेर छपराच्या दिशेने एक काठी लावून ठेवा. भीतीने ते येणार नाहीत आणि आलेच तरी त्यांच्यामुळे आजार पसरणार नाही.
7 / 9
हा थोडा खर्चिक पण असरदार पर्याय आहे. खिडकीला हा ट्रॅक जोडल्यामुळे कबुतरे घरात येत नाहीत आणि आली तर शॉक लागून त्वरित उडून जातात. हा शॉक त्यांच्या जीवावर बेतणारा नसतो. मात्र त्यांना हाकलण्यासाठी तो पुरेसा झटका देणारा असतो.
8 / 9
वास्तुशास्त्रात विंड चाइम्स सकारात्मक लहरी निर्माण करण्यासाठी वापरले जात असले तरी त्याचा दुसरा सदुपयोग म्हणजे विंड चाइम्स च्या आवाजाने कबुतरे घाबरतात आणि घराजवळ थांबत नाहीत. त्यामुळे वाऱ्याच्या दिशेने असलेल्या खिडकीत विंड चाइम्स लावा आणि कबुतरांना पळवा.
9 / 9
घरात, खिडकीत, गॅलरीत कबुतराने ठाणे मांडले की रोगराईनेसुद्धा ठाणे मांडले असे समजा. कबुतरांच्या बाबतीत भूतदया दाखवणे महाग पडू शकते. म्हणून अनेक ठिकाणी कबुतर खाना बंद करा अशीही मागणी न्यायालयापर्यंत गेली आहे. यावर घरापुरता उपाय म्हणजे त्यांना आपल्या घरात घरटे करू देऊ नका. वेळीच त्यांचा संसार स्थलांतरित करा आणि रोगमुक्त व्हा.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स