शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! "मंकीपॉक्सचा हा स्ट्रेन घेऊ शकतो कोरोनापेक्षाही खतरनाक महामारीचं रूप"; संशोधक चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 4:09 PM

1 / 8
गेल्या वर्षी 12 मे रोजी लंडनमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला होता, तेव्हापासून या आजाराने जगभरात खळबळ माजवली आहे. आतापर्यंत जगभरात सुमारे 20 हजार जणांना या आजाराची लागण झाली आहे. आता एका नव्या भीतीमुळे संशोधक चिंतेत आहेत. खरं तर, महामारी शास्त्रज्ञांनी सध्याच्या व्हायरसच्या स्वरूपाची तुलना स्मॉलपॉक्सच्या व्हायरसशी केली आहे.
2 / 8
ऐतिहासिकदृष्ट्या, या व्हायरसने गेल्या 3000 वर्षांमध्ये धोकादायक महामारीच्या रूपात जगाला अनेक वेळा हादरवून सोडलं आहे. आता संशोधकांना असं आढळून आलं आहे की, सध्याच्या व्हायरसचं स्वरूप पूर्वीच्या मंकीपॉक्स व्हायरसपेक्षा वेगळं आहे. यामुळे पुन्हा एकदा टेन्शन वाढलं आहे.
3 / 8
चिंतेची बाब ही आहे की, जर हा मंकीपॉक्स व्हायरस मोठ्या प्रमाणात वाढला किंवा त्याचे स्ट्रेन तयार झाले, तर जगाला पुन्हा एकदा एका धोकादायक साथीच्या रोगाचा सामना करावा लागेल. हा साथीचा रोग एकेकाळी ज्याप्रमाणे स्मॉलपॉक्स व इन्फ्लुएंझा व्हायरसने जगाला उद्ध्वस्त केलं होतं, त्याप्रमाणेच असेल.
4 / 8
‘द इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, मे 2022 नंतर मंकीपॉक्सचा प्रसार मोठ्या वेगाने झाला आहे. आतापर्यंत, युरोप, अमेरिका, ओशानिया, आशिया आणि आफ्रिकेमध्ये या रोगाची लागण झालेली 20 हजारांहून अधिक प्रकरणं आढळून आली आहेत. त्यामुळे हा रोग स्मॉलपॉक्स किंवा इन्फ्लुएंझासारख्या नवीन साथीच्या रोगाचे संकेत देतोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
5 / 8
बायोसेफ्टी अँड हेल्थ पेपरमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की सध्या यासाठी आणखी चाचण्या करणं गरजेचं आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत व्हायरसच्या वैशिष्ट्यांमध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहे. तसंच मागच्या काही काळात लोकांना याचा संसर्ग होण्याचं प्रमाण अनेक देशांमध्ये वेगानं वाढलं आहे.
6 / 8
एक महत्त्वाची बाब म्हणजे मंकीपॉक्सची लागण सर्वाधिक समलैंगिक लोकांना झाल्याचंही दिसून आलं आहे. अनेक संशोधक आणि जाणकारांशी चर्चा केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने त्या विषाणूला एमपॉक्स (mpox) असं नाव दिलं आहे तर काही देशांमध्ये त्याला MPXV असं नाव देण्यात आलं आहे.
7 / 8
डब्ल्युएचओच्या म्हणण्यानुसार, दोन्ही नावं मंकीपॉक्स फेज आऊट होईपर्यंत एक वर्षासाठी ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडोतील शास्त्रज्ञांनी सेल जर्नलमध्ये एक संशोधन प्रकाशित केलं आहे. त्यात असं म्हटलं आहे की जंगली आफ्रिका प्रायमेट्स प्राण्यांमध्ये अज्ञात व्हायरस आढळल्याचं समोर आलं आहे.
8 / 8
लागण झाल्यावर इबोलासारखी लक्षणं दिसतात. हा व्हायरस माणसांसाठीही धोक्याची घंटा आहे. या प्रकारचा विषाणू मकाक्यू माकडांसाठी धोकादायक म्हणून ओळखला गेला आहे. पण, त्याचा माणसांवर काय परिणाम परिणाम होऊ शकतो, याचा तपास करणं अद्याप बाकी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स