Health: These bad habits reduce the sperm count in men, which can lead to damage if neglected
Health: या वाईट सवईंमुळे कमी होतो पुरुषांमधील स्पर्म काऊंट, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 5:50 PM1 / 6काही वाईट सवयीं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. हो काही वाईट सवयींमुळे तुमच्या स्पर्म काऊंटवरू विपरित परिणाम होऊ शकतो. अधिक तणाव आणि चुकीच्या लाईफ स्टाईलमुळे तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काही वाईट सवयी सोडाव्या लागतील. 2 / 6जे पुरुष मोठ्या प्रमाणावर धुम्रपान करतात, त्यांच्यातील स्पर्मच्या संख्येवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे सिगारेट पिण्याची ही सवय आजच सोडा. 3 / 6रात्री उशिरा झोपल्यामुळे तुम्हाला तणाव आणि लठ्ठपणाची समस्या होऊ शकते. त्यामुळे स्पर्म काऊंट कमी होऊ शकतो. त्यामुळे रात्री उशिरा झोपण्याची सवय बदलली पाहिजे. 4 / 6मद्यपान, तंबाखूचं सेवन हे पुरुषांसाठी हानीकारक ठरू शकते. अतिमद्यपान केल्यामुळे टेस्टोस्टेरोनवर प्रभाव पडतो. ज्यामुळे स्पर्मच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो. 5 / 6योग्य व्यायाम न केल्याने लठ्ठपणाची समस्या निर्माण होऊ शकते. तर लठ्ठपणामुळे तुमच्यातील स्पर्मची गतिशिलता मंदावते. त्यामुळे पुरुषांनी दररोज व्यायाम केला पाहिजे. 6 / 6तुम्ही वारंवार प्रत्येक गोष्टीवरून तणावाखाली जाता का? तसं असेल तर वेळीच सावध व्हा. कारण पुरुषांमधील तणावामुळेही स्पर्म काऊंट कमी होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आजपासूनच खूश राहण्याचा प्रयत्न करा. (सूचना - ही माहिती सर्वसाधारण समजुती आणि घरगुती उपायांवर आधारित आहे. कुठलेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.) आणखी वाचा Subscribe to Notifications