शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त दूधच नाही, तर 'या' गोष्टींमधूनही मिळतं कॅल्शियम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 1:04 PM

1 / 7
आपली हाडे, दात आणि स्नायू यांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम (Calcium)खूप महत्त्वाचे आहे. शरीरातील काही एन्झाईम्स आणि हार्मोन्सच्या विकासासाठीही याची गरज असते. कॅल्शिअमचे नाव येताच दूध, दही आणि चीज यांची नावे नक्कीच मनात येतात.
2 / 7
दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते परंतु इतरही अनेक पदार्थ आहेत, ज्यात कॅल्शियम भरपूर असते. हे खाल्ल्याने शरीर लोहासारखे मजबूत होऊ शकते. अशाच पाच पदार्थांबद्दल जाणून घ्या, ज्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं...
3 / 7
बदाम खाल्ल्यानं मेंदू तीक्ष्ण तर होतोच पण हाडेही मजबूत होतात. फक्त १ कप संपूर्ण बदामामध्ये ३८५ मिलीग्राम कॅल्शियम असतं. बदाम खाल्ल्यानं शरीरात ताकद वाढते. मात्र, बदाम खाल्ल्यामुळे कॅलरीज आणि चरबी देखील वाढते, त्यामुळं त्याचे सेवन मर्यादित केलं पाहिजे.
4 / 7
सुके अंजीर देखील कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. १ कप अंजीरमध्ये २४१ मिलीग्राम कॅल्शियम आढळते. अंजीरमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स देखील चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळं अनेक रोगांपासून बचाव होतो. अंजीर खाल्ल्यानं केवळ हाडे आणि स्नायू मजबूत होत नाहीत तर संपूर्ण आरोग्यालाही फायदा होतो.
5 / 7
सोयाबीनपासून बनवलेले टोफू हे कॅल्शियमचे भांडार आहे. अर्धा कप टोफूमध्ये २७५ मिलीग्राम कॅल्शियम आढळून येऊ शकते. टोफूच्या वेगवेगळ्या ब्रँडमध्ये कॅल्शियमचे प्रमाण देखील बदलू शकते. हे खाल्ल्यानं शरीराला प्रचंड फायदा होतो.
6 / 7
सोयाबीनपासून बनवलेले टोफू हे कॅल्शियमचे भांडार आहे. अर्धा कप टोफूमध्ये २७५ मिलीग्राम कॅल्शियम आढळून येऊ शकते. टोफूच्या वेगवेगळ्या ब्रँडमध्ये कॅल्शियमचे प्रमाण देखील बदलू शकते. हे खाल्ल्यानं शरीराला प्रचंड फायदा होतो.
7 / 7
दिसायला लहान असलेल्या चिया सीड्समध्ये कॅल्शियम भरपूर असतं. चियामध्ये बोरॉन असतं, जे शरीरात कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमचं चयापचय करण्यास मदत करतं. त्यामुळं हाडे आणि स्नायू मजबूत होतात. याशिवाय कॅल्शियमसाठी तुम्ही भेंडी, संत्रा, सूर्यफूल, ब्रोकोली, तीळ आणि रताळे खाऊ शकता.
टॅग्स :milkदूधHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स