Health Tips: According to all diet experts, is it beneficial to eat before sunset? Know the reasons!
Health Tips: सगळ्या आहार तज्ञांच्या मते, सूर्यास्ताआधी जेवणे फायदेशीर का? जाणून घ्या कारणे! By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 9:17 AM1 / 5अलीकडच्या डाएट बाबतीत एवढा संभ्रम निर्माण झाला आहे, की कोणाचे ऐकावे आणि कोणाचे नाही अशी परिस्थिती आली आहे. तरीदेखील एका बाबतीत सर्व आहार तज्ज्ञांचे एकमत होते, ते म्हणजे सूर्यास्ताआधी जेवणे. या गोष्टीला धर्म शास्त्राने देखील दुजोरा दिला आहे. एवढेच नाही, तर पूर्वीच्या काळी या गोष्टीचे कटाक्षाने पालन केले जात असे. एवढेच काय, तर निसर्गात डोकावले तर पशु पक्षी देखील सूर्यास्तानंतर खात पित नाही. याचा अर्थ हा नियम निसर्गाला अनुसरून आहे का? यामागे नेमके कारण काय आहे, ते जाणून घेऊया... 2 / 5पहिले कारण : सूर्यास्ताआधी जेवल्याने पचनक्रिया नियंत्रित राहते. सेवन केलेले अन्न दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत व्यवस्थित पचते. या काळात अन्न पचायला पुरेसा वेळ मिळतो. याउलट उशिरा जेवल्याने आणि लगेच झोपल्याने अन्न पचत नाही आणि त्याचे रूपांत ऊर्जेत न होता मेद वृद्धीत होते. 3 / 5दुसरे कारण : सूर्यास्ताआधी जेवल्याने अनेक प्रकारच्या रोगांपासून बचाव होतो. रात्रीचे जेवण उशिरा घेतल्यामुळे ते पचत नाही आणि विविध रोग शरीरात घर करतात. रात्री झोप पूर्ण होते. सकाळी वेळेत पोट साफ होते. दिवसभर थकवा जाणवत नाही. 4 / 5तिसरे कारण : सूर्यास्तानंतर सूर्य प्रकाशाअभावी वातावरणात सूक्ष्म जिवाणूंचे साम्राज्य वाढते. ते जिवाणू अन्नात शिरकाव करतात आणि त्यामुळे अनेक व्याधी जडतात. वातावरणात आलेले जडत्त्व आपल्या शरीरालाही जाणवते, पण त्याकडे दुर्लक्ष करून आपण जेवतो आणि रोगांना आमंत्रण देतो. 5 / 5चौथे कारण : सूर्यास्तानंतर प्रकृतीत अनेक बदल घडतात. पशु पक्षी देखील सूर्यास्ताआधी जेवून झोपी जातात. आपल्या शरीरावर निसर्गाचा प्रभाव पडत असतो. आपण प्रकृतीशी जेवढे जुळवून घेऊ, तेवढे निरोगी राहू. म्हणून ही दिनचर्या आत्मसात करणे सोयीस्कर ठरते. आणखी वाचा Subscribe to Notifications