Health Tips: Do your lips crack even in summer? Know the cause and quick remedy!
Health Tips: उन्हाळ्यातही तुमचे ओठ फुटतात? जाणून घ्या कारण आणि झटपट उपाय! By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 5:10 PM1 / 7कापसाच्या तुकडयाने किंवा स्वच्छ बोट खोबरेल तेलात बुडवून ओठांवर लावा. दिवसभरात आवश्यकतेनुसार कितीही वेळा हे लावता येऊ शकते. रात्री झोपताना ओठांना तेलाच्या बोटाने मसाज केल्यास त्वचा सुधारते. 2 / 7बाजारात अनेक प्रकारच्या एलोवेरा जेल मिळतात. त्यात चांगल्या प्रतीच्या जेल ची निवड करावी. बोटांनी ऍलोवेरा जेल ओठांवर लावावे. ऍलोवराच्या एंजाइममध्ये माइल्ड एक्सफोलिएटिंगचे गुण आढळतात. त्यामुळे याचा उपयोग दिवसातून २ ते ३ पेक्षा जास्त वेळा करु नये.3 / 7मधाचा वापर सहज सोपा आणि अत्यंत गुणकारी असतो. मध ओठांवर लावण्यासाठी नेहमी सेंद्रिय किंवा कच्चे मध निवडा. तर्जनीवर मध घेऊन तो ओठांवर लावा. परंतु मधाची ऍलर्जी असणाऱ्या लोकांनी हा उपाय करणे टाळावे.4 / 7व्हाइट पेट्रोलियम जेली हा स्वस्त आणि मस्त उपाय आहे. मात्र उन्हाळ्यात त्याचा जास्तही वापर करू नये. दिवसातून एक ते दोन वेळा त्याचा उपयोग करावा. कारण प्रमाणापेक्षा जास्त वापराने ओठांची त्वचा काळवंडू शकते. 5 / 7सकाळी अंघोळ झाल्यावर आणि रात्री झोपताना कापसाच्या बोळ्याने गुलाबपाणी ओठांना लावा. त्यामुळेही ओठ मऊसूत होतात. ओठांच्या नाजूक त्वचेला गुलाबपाण्याने हायड्रेशन मिळते आणि ओठ गुलाबी होतात. 6 / 7सर्दी असो नाहीतर गर्मी, घरी बनवलेले साजूक तूप ओठांसाठी केव्हाही चांगले. घरी कढवलेले साजूक तूप नसेल तर बाजारातून विकतचे गायीचे तूप आणावे आणि दिवसातून गरजेनुसार तीन ते चार वेळा तुपाचे बोट ओठांवर फिरवावे. रात्री हा उपाय केल्यास लवकर फरक पडतो. 7 / 7उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्यायची असेल तर भरपूर पाणी प्या हा मुख्य सल्ला दिला जातो. शरीरात पाण्याची पातळी संतुलित असेल तर त्वचाविकार होत नाहीत. ओठ हा आपल्या शरीराचा नाजूक भाग. ते कोरडे पडणे, फाटणे म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली हे समजावे. आणखी वाचा Subscribe to Notifications