Health Tips: Don't worry about cholesterol anymore; Do 'these' five simple home remedies!
Health Tips: आता कोलेस्ट्रॉलची काळजी नको; करा 'हे' पाच सोपे घरगुती उपाय! By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 7:00 AM1 / 6कोलेस्ट्रॉलमुळे मुख्य भीती असते ती म्हणजे हृदय विकाराची. अलीकडच्या काळात अनेक तरुण हृदय विकाराने दगावल्याचे आपण ऐकत आहोत. हा धोका टाळण्यासाठी कोलेस्ट्रॉल कमी करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित करू शकता किंवा कमी करू शकता, जसे की मधुमेह आणि वजन नियंत्रित ठेवणे. तसेच उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत, ज्यामुळे हा वाईट पदार्थ नैसर्गिकरित्या विघटन होऊ शकते. पैकी आपल्या घरातच आढळतील असे घटक जाणून घेऊ.2 / 6कोथिंबिरीमुळे कोलेस्ट्रॉल घटण्यास मदत होते आणि मूत्राद्वारे ते शरीराबाहेर टाकले जाते. तसेच रात्रभर धने भिजवलेले पाणी पिणेही शरीरासाठी हितकारक ठरते. त्यासाठी चमचाभर धने पुरेसे असतात. तज्ज्ञांच्या मते, धने लघवीचे प्रमाण वाढवणारे औषध म्हणून ओळखले जाते. त्याच्या नित्य सेवनामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुधारते आणि शरीरातील कचरा काढून टाकण्यास मदत करते. शरीरातून अतिरिक्त कोलेस्टेरॉल काढून टाकण्यासाठी ते मूत्रपिंडाला मदत करते.3 / 6लसूण हा आणखी एक उत्तम आयुर्वेदिक घटक आहे, जो वाईट कोलेस्टेरॉल दूर ठेवण्यास मदत करते. लसणाच्या दोन पाकळ्या रोज अंशपोटी चघळल्याने शरीरातील उच्च कोलेस्ट्रॉलचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. लसूण एक उत्कृष्ट अँटी-ऑक्सिडंट देखील आहे आणि त्यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत.4 / 6कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर उपचार करण्यासाठी तुळशी ही एक अद्भुत आणि प्रभावी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. तुळशीची पाने मूत्रपिंडाद्वारे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढून टाकू शकतात. दररोज 2-3 तुळशीची पाने चघळल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.5 / 6गुग्गुळ ही लोकप्रिय आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपैकी एक आहे जी उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉलवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. या औषधी वनस्पतीमध्ये असलेले गुणधर्म रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलचे सक्रिय अवरोधक म्हणून ओळखले जाते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, तुम्ही चार-पाच दाणे गुग्गुळाचे रोज सेवन घेऊ शकता.6 / 6अर्जुन ही आणखी एक शक्तिशाली आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी हृदयाशी संबंधित समस्या जसे की कोंदलेल्या शिरा मोकळ्या करणे, हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह सुरळीत ठेवणे इ. काम करते. अर्जुनाच्या झाडाची साल चूर्ण स्वरूपात सेवन करता येते. अर्जुन पावडरमध्ये कोलेस्टेरॉल विरघळण्याची आणि हार्ट ब्लॉकेज होण्यापासून रोखण्याची क्षमता आहे. पावडर सकाळी (नाश्त्यापूर्वी) कोमट पाण्यासोबत सेवन करता येते. आणखी वाचा Subscribe to Notifications