Health Tips : How avoid risk heart attack you should know this
हार्ट अटॅकचा धोका टाळायचा असेल तर फॉलो करा या टिप्स, जीवाचा धोका टळेल! By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 4:11 PM1 / 9हृदय निरोगी असणं हे तुमच्या आरोग्यावर अवलंबून असतं. अलिकडे हृदय विकारे झटके येणे आणि त्यात जीव गमावण्याचं प्रमाण वाढलेलं बघायला मिळतं. बदललेली लाइफस्टाइल हेही यातील एक महत्वाचं कारण आहे. हृदय विकाराचा झटका येण्यासाठी आता वयाची मर्यादा राहिली नाहीये. कमी वयातही हृदय विकाराचे झटके येतात. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. चला जाणून घेऊ काही खास गोष्टी....2 / 9पुरेशी झोप - हॉवर्डच्या ७० हजार महिलांवर केलेल्या एका अभ्यासानुसार, झोप आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी जास्त फायद्याची आहे. या अभ्यासात आढळून आलं की, जे लोक रात्री एक तास अधिक झोप घेतात त्यांना हृदयाचे आजार इतरांच्या तुलनेत कमी असतात. तेच ७ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना हृदयाचे आजार होण्याची शक्यता अधिक असते. 3 / 9कोलेस्ट्रॉल कमी करा - रक्तात अधिक प्रमाणात कोलेस्ट्रॉल असणे फार घातक आहे. याने हृदयासंबंधी आजार होऊ शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवा आणि सतत तपासणी करत रहा. 4 / 9नियमित व्यायाम करा - नियमित व्यायाम करणे वजन कमी राहण्यास मदत होते. यामुळे मधुमेह होण्याचीही शक्यता कमी असते. मधुमेह असलेल्या लोकांना हार्टअटॅक येण्याची शक्यता अधिक असते. 5 / 9फॅटपासून दूर रहा - जेवणातील तेलाचं प्रमाण कमी करून ताज्या हिरव्या भाज्या आणि फळांचं सेवन वाढवा. यातून तुम्हाला अॅंटी-ऑक्सीडेंट्स मिळतात. यामुळे कोलेस्ट्रोलचा प्रभाव कमी होतो. रोज भाज्या खाल्यास हृदय निरोगी राहतं. सोबतच जंक फूडचं सेवनही कमी करा. वेळेवर जेवण करणे अधिक चांगले.6 / 9धुम्रपान करू नका - सिगारेट ओढणे महिलांच्या हृदयासाठी फारच घातक आहे. मध्यम वर्गातील महिलांना तंबाखूमुळे हार्टअटॅक येऊन जीव गमवावा लागण्याचं प्रमाण हे ५० टक्के आहे. धुम्रपानामुळे हार्टअटॅक येण्याची शक्यता अधिक असते. 7 / 9वजन नियंत्रित ठेवा - जर तुमचं वजन जास्त असेल तर तुमच्या हृदयावर अधिक दबाव पडतो. हृदयाचे ठोके अधिक वाढतात. वजन वाढण्याचं कारण असंतुलित आहार, व्यायाम न करणे हे आहेत. अशात इतरही काही गंभीर आजार होतात. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवा.8 / 9तणाव कमी करा - तणाव हार्ट अटॅक येण्याचं मुख्य कारण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न हे तणाव कमी करण्यासाठी केले पाहिजे. त्यासोबतच रोजच्या आहारातही काही बदल करायला हवेत. 9 / 9मद्यसेवन कमी करा - मद्याच्या प्रमाणापेक्षा जास्त सेवनामुळे हाय बीपी आणि हृदयासंबंधी आणखीही आजार होतात. त्यामुळे मद्याचं सेवन कमी करणे हा उत्तम पर्याय आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications