health tips is it healthy to eat rice more than once in day
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 11:25 AM1 / 10बऱ्याच लोकांना चपातीपेक्षा भात खायला जास्त आवडतो, कारण तो हलका असतो आणि पटकन तयार होतो, पण तुम्ही दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा भात खाऊ शकता का? याबाबत जाणून घेऊया... 2 / 10भात खाल्ल्याने वजन, लठ्ठपणा वाढतो असं बहुतेकांना वाटतं, पण भात योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ला तर तो आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो आणि त्यामुळे शरीरातील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण पूर्ण होते. 3 / 10बहुतेक लोकांना प्रश्न पडतो की, आपण भात खाल्ला पाहिजे का? किती भात खावा?, दिवसातून किती वेळा भात खाऊ शकतो?, दिवसातून दोनदा भात खाणे योग्य की अयोग्य? य़ाविषयी सविस्तर माहिती घेऊ. 4 / 10वजन कमी करण्यासाठी, भात दिवसातून एकदा किंवा दोनदा खाण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो, कारण भातामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. पण यापेक्षा जास्त वेळा भात खाल्ल्यास तुमच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरीज वाढतात. 5 / 10भातात कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात, जर तुम्ही साध्या भाताऐवजी ब्राऊन राइस किंवा लाल तांदूळ खाल्ला तर त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम देखील असतात. 6 / 10ग्लूटेन इन्टॉलरेन्स लोकांसाठी ब्राऊन राइस किंवा लाल तांदूळ खाणं फायदेशीर ठरू शकतं. चपातीच्या जागी, तुम्ही दिवसातून एक किंवा दोन वेळा एक वाटी भात खाऊ शकता.7 / 10जर दह्यासारख्या प्रोबायोटिकसोबत थोड्या प्रमाणात भात खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. भाज्या आणि इतर खाद्यपदार्थांसोबतही भात खाता येतो. 8 / 10आहारात तांदूळ समाविष्ट करण्यासाठी तुम्ही अधूनमधून इडली, डोसा किंवा बिर्याणी यांसारखे पदार्थही करून पाहू शकता.9 / 10आता असा प्रश्न पडतो की रोजच्या आहारात कोणता तांदळाचा भात खावा? तर तुम्ही साध्या पांढऱ्या तांदळाचं सेवन देखील करू शकता, परंतु त्यातील स्टार्च काढून तो कमी प्रमाणात खाऊ शकता. 10 / 10ब्राऊन राईस किंवा लाल तांदळामध्ये भरपूर प्रमाणात पोषक आणि फायबर असतात, जे रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रित करू शकतात आणि एकंदर आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications