शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवसा जास्त झोपल्याने शरीराला होतात हे गंभीर नुकसान, जाणून घ्या किती झोपावं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 5:22 PM

1 / 6
Why we should not sleep in day time: दिवसा दुपारी जेवण केल्यावर अनेकांना झोप येते. पण दिवसा झोपणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. जे कुणी दुपारी झोपतात त्यांची रात्रीची स्लीप सायकल विस्कळीत होते. याने तुमची रात्रीची झोप खराब होते. ज्यामुळे शरीरावर सूज, हृदयरोग, अल्जायमर आणि हाय बीपीची समस्या निर्माण होऊ शकते.
2 / 6
हार्मोन हेल्थ खराब होते - प्रत्येक रात्री पुरेशी झोप घेणं तुमच्या हार्मोनचं प्रमाण आणि निर्मितीशी कनेक्टेड असतं. जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर पौष्टिक आहार खाणं खासकरून महत्वाचं ठरतं. जेव्हा तुम्ही दुपारी झोपता तेव्हा रात्री तुम्हाला लवकर झोप येत नाही. यामुळे हार्मोन अंसतुलन होतं. याने तुमचा मूड खराब होतो आणि अनेकदा तुम्हाला डिप्रेस़्डही वाटतं.
3 / 6
अपचन आणि लठ्ठपणा - दिवसा झोपल्याने तुमच्या डायजेस्टिव एंजाइम्सवर प्रभाव पडतो आणि याने जेवण योग्यप्रकारे पचत नाही. सोबतच याने ब्लोटिंगची समस्याही निर्माण होते. काही न खाता तुम्हाला पोट भरलेलं जाणवतं. त्यासोबतच तुम्ही क्रेविंग वाढते जी अनेक समस्यांचं कारण ठरू शकते. तसेच दिवसा झोपल्याने लठ्ठपणा वेगाने वाढतो. दिवसा झोपल्याने डायजेशन खराब होतं तेच मेटाबॉलिज्मही स्लो होतं. ज्यामुळे लठ्ठपणा वेगाने वाढतो.
4 / 6
शरीरावर सूज वाढते - शरीरावर फार जास्त सूज तुमच्या आरोग्यासाठी चांगली नाही. सतत पुरेशी झोप न घेणं याचं कारण असू शकतं. दिवसा झोपल्याने शरीरावर सूज वाढते. त्यामुळेच ब्लोटिंगही निर्माण होते.
5 / 6
दिवसा किती झोपावं? - दिवसा रात्रीसारखी गाढ झोप अजिबात घेऊ नये. दिवसा 10 ते 20 मिनिटांची झोप घ्या. याने तुम्हाला सतर्क आणि फ्रेश वाटेल. तसेच दुपारी 30 मिनिटांपेक्षा जास्त झोप घेऊ नये. दुपारी 3 वाजतानंतर झोप घेत असाल तर तुम्हाला रात्री झोप येणार नाही.
6 / 6
दुपारी 10 मिनिटांच्या झोपेचे फायदे - दुपारच्या वेळी केवळ 10 ते 20 मिनिटे पॉवर नॅप घ्या. या छोट्या वेळाच्या झोपेने तुम्हाला फ्रेश वाटेल. त्यासोबतच या झोपेचे अनेक फायदेही आहेत. जसे की, ब्लड प्रेशर कमी होतं, थकवा दूर होते, मेंदू सतर्क होतो, फ्रेश वाटतं. याने प्रॉडक्टिविटी वाढते. तसेच तुमचा मूड चांगला झाला तर ब्रेनच्या क्रियाही व्यवस्थित होतात.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य