शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हिवाळ्यात निरोगी राहण्याचा सोपा फंडा; जाणून घ्या व्हिटामीन्सचा खजिना असलेल्या मटारचे फायदे

By manali.bagul | Published: November 24, 2020 1:35 PM

1 / 8
हिवाळ्याच्या वातावरणात बाजारात मोठ्या प्रमाणावर हिरवे वाटाणे उपलब्ध असतात. इतरवेळी तुम्ही फ्रोजन मटार खात असाल पण आता थंडीच्या वातावरणात तुम्हाला ताजे वाटाणे सहज मिळतील. अनेक घरांमध्ये भाज्यांमध्ये, पराठ्यांसाठी हिरव्या वाटाण्यांचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला वाटाण्यांच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. तुम्हाला नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही आता वाटाण्यांचा आहारात समावेश करू शकता.
2 / 8
वजन कमी करण्यासाठी- चांगले वजन कमी करण्यासाठी हिरवे वाटाणे हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. वाटाण्यात फायबर्स, प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात. हिरव्या वाटाण्याच्या सेवनाने सतत भूक लागत नाही. परिणामी वजन कमी करण्यासाठी मदत होते.
3 / 8
हृदयाच्या आजारांपासून लांब राहता येतं- वाटाण्यांमध्ये असणारे मॅग्नीशियम, पोटेशियम और कॅल्शियम हृदयाला चांगले ठेवते. रक्तदाबाच्या समस्यांपासून लांब राहता येतं. वाटाणे शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यातील एंटीऑक्सिडंट्समुळे हृदयावर सकारात्मक परिणाम होतो.
4 / 8
पचनासाठी फायदेशीर- वाटाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. त्यामुळे शरीरात चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होण्यास मदत होते. यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. मटार खाल्याने पोट साफ होण्यास मदत होऊन गॅस, एसिडीटीची समस्या जाणवत नाही.
5 / 8
डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतील- वाटाण्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यात मदत होते. यात प्रोटिन्स आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात अससतात. मटारमध्ये व्हिटामीन B, A, K, C असते. त्यामुळे डायबिटीसचा धोका कमी होण्यास मदत होते.
6 / 8
रोगप्रतिकारकशक्ती वाढते- हिरव्या मटारमध्ये लोह, झिंक, मॅगनीज, कॉपर ही पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. ही सर्व तत्त्वे शरीराचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यासोबतच यात अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व असतं, ज्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाते. याने शरीराला वेगवेगळ्या आजारांपासून लढण्यास मदत मिळते.
7 / 8
केसगळती होते कमी- मटारमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे केसगळती रोखली जाऊ शकते. तसेच केस मुलायम आणि मजबूत होण्यासही मदत मिळते. त्यासोबतच यात असलेल्या व्हिटॅमिन बी ६, बी १२ आणि फॉलिक अॅसिड लाल रक्तपेशी तयार करण्यास फायदेशीर ठरतात. याने केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात.
8 / 8
हाडं मजबूत होतात- वेगवेगळ्या शोधातून हे समोर आलं आहे की, मटारमध्ये व्हिटॅमिन 'के' भरपूर प्रमाणात असतात. जे शरीरातील हाडांना मजबूत करतात. त्यासोबतच याने हाडांमध्ये होणाऱ्या ऑस्टियोपोसिसचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. याचा अर्थ मटार हाडांच्या सुरक्षेसाठी फायदेशीर आहे.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न