शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हाडांसाठी घातक ठरतोय वजन कमी करण्याचा 'हा' उपाय; संशोधनातून माहिती समोर

By manali.bagul | Published: November 29, 2020 9:34 AM

1 / 6
वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे डाएट्स, जिम ट्रेनिंग आणि कॅलरी बर्न करत असलेल्या सप्लिमेंट्चा वापर करतात. असे काही लोक आहेत ज्यांनी स्लिम-फिट बॉडीसाठी 'स्लीव्ह गेस्ट्रेक्टॉमी' नावाच्या वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेचा अवलंब करण्यास सुरवात केली आहे. . एका नवीन अभ्यासानुसार या शस्त्रक्रियेचे भयंकर दुष्परिणाम समोर आले आहेत.
2 / 6
स्लीव्ह गॅस्ट्रिकॉमीमध्ये, वजन कमी करण्यासाठी सुमारे ७५ टक्के पोटाचा भाग काढून टाकला जातो. सायन्स डेलीच्या एका अहवालानुसार २००५ ते २०१९ या काळात स्लीव्ह गॅस्ट्रिकॉमीच्या माध्यमातून किशोरवयीन मुलांमध्ये वजन कमी होण्याच्या केसेसमध्ये १०० टक्के वाढ झाली आहे. आरोग्य तज्ञांचा असा दावा आहे की वजन कमी करण्याच्या या पद्धतीचा परिणाम हाडांवर (कमकुवत हाड) होतो.
3 / 6
हार्वर्ड मेडिकल स्कूल (बोस्टन) मधील रेडिओलॉजीचे प्राध्यापक. ब्रेडेला यांनी सांगितले की, 'या वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेचा मानवी हाडांवर दीर्घकाळ वाईट परिणाम होऊ शकतो.' या अभ्यासामध्ये ५२ लठ्ठ पौगंडावस्थेतील मुलांच्या शरीराची तपासणी केली गेली. त्यापैकी २६ जणांना स्लीव्ह गॅस्ट्रिकॉमी अंतर्गत ठेवले होते.
4 / 6
सुमारे एक वर्ष किशोरवयीन मुलांच्या आरोग्यावर लक्ष ठेवल्यानंतर, संशोधकांना त्यांच्या वजनात १३ ते २८ किलो कमी दर्शविले. तसेच, त्याच्या हाडांमध्ये आणखी 'मॅरो फॅट' सापडले आणि कमरेच्या मणक्यात 'हाडांची घनता कमी होण्याची समस्या' दिसून आली.
5 / 6
डॉ. ब्रेडेला यांनी सांगितले की, ''स्लीव्ह गॅस्ट्रिकॉमीनंतर हाडांमध्ये हाडांची घनता कमी होण्याची शक्यता असते. हाडांची घनता गमावण्याव्यतिरिक्त हे आपल्या हार्मोन्स आणि शरीराला आवश्यक असलेल्या पोषक द्रव्यांवर देखील परिणाम करते.''
6 / 6
पुढे त्यांनी सांगितले की म्हणाले, ''आम्हाला हाडांसाठीही सुरक्षित अशी यंत्रणा शोधण्याची गरज आहे. हाडांच्या आणि स्नायूंच्या विकासासाठी पौगंडावस्थेचा अत्यंत महत्वाचा काळ आहे. यावेळी आरोग्यासह केलेला चुकीचा प्रयोग भविष्यात भयंकर हानी पोहोचवू शकतो.''
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य