health tips mixed fruit juice side effects may increase blood sugar level
मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकतो घातक, 'हे' आहे मोठं कारण By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 4:13 PM1 / 8फळं खाणं पौष्टिक आणि फायदेशीर मानलं जातं. यामुळे शरीराचा अनेक आजारांपासून बचाव करता येतो. यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, जे आरोग्य चांगलं ठेवतात. 2 / 8आजकाल फळांच्या रसाचा ट्रेंड वाढला आहे. बहुतेक लोक फळ खाण्याऐवजी त्याचा ज्यूस पितात. अशातच त्यांना मिक्स्ड फ्रूट ज्यूस म्हणजेच सर्वच फळांचा रस जास्त फायदेशीर वाटतो. त्यामुळेच मिक्स्ड फ्रूट ज्यूसची मागणीही वाढली आहे.3 / 8शरीरासाठी याचे अगणित फायदे आहेत असं म्हटलं जातं. मात्र सत्य हे आहे की, जेव्हा फळांमधून रस काढला जातो तेव्हा त्यातील अनेक पौष्टिक घटक नष्ट होतात. फायबर आणि इतर माइक्रोन्यूट्रेंट्स देखील नष्ट होतात. 4 / 8फ्रूक्टोजचे प्रमाण त्यामध्ये जास्त असते, जे पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. मिक्स्ड फ्रूट ज्यूस का पिऊ नये हे जाणून घेऊया... न्यूट्रिशनिस्ट्स मते, मिक्स्ड फ्रूट ज्यूसमध्ये कॅलरीज खूप जास्त असतात. 5 / 8एक कप ज्यूसमधून ११७ कॅलरीज मिळतात. याशिवाय त्यात फ्रूक्टोजही जास्त असतं. एक कप रसामध्ये सुमारे २१ ग्रॅम साखर असते. यामुळे आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. या ज्यूसमुळे रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय वाढते. 6 / 8मधुमेहाच्या रुग्णांसाठी मिक्स्ड फ्रूट ज्यूस हा अत्यंत घातक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मिक्स्ड फ्रूट ज्यूस बनवताना फळातील रस काढला जातो आणि उरलेला भाग फेकून दिला जातो. टाकून दिलेल्या भागामध्ये फायबर असते. 7 / 8फायबर हे पचनासाठी खूप महत्त्वाचं असल्याने फायबर नसलेला ज्यूस प्यायल्याने पचनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे ॲसिडिटीची समस्या वाढू शकते. गॅस्ट्रिकच्या रुग्णांसाठी हे हानिकारक ठरू शकतं.8 / 8ज्यूसमधील फायबर काढून टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात फ्रूक्टोज शिल्लक राहते, ज्यामुळे दात किडण्याची शक्यता असते. हा ज्यूस लिव्हर योग्य प्रकारे हायड्रेट करू शकत नाही आणि मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिण्याचे दुष्परिणाम काही दिवसांनी दिसून येतात. आणखी वाचा Subscribe to Notifications