Health Tips : On your bed sheets lakhs and crores bacteria exists its harmful what to do
ना टॉयलेट ना फोन बेडशीट आणि उशीवर असतात कोट्यावधी बॅक्टेरिया, वाचून बसेल धक्का... By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 3:02 PM1 / 8Bacteria on Bedsheets : तुमची जुनी बेडशीट तुमच्यासाठी फार गंभीर ठरू शकते. कारण यात कोट्यावधी बॅक्टेरिया असतात. तुम्ही बेडशीट किती दिवसात स्वच्छ केली पाहिजे आणि किती दिवसात बदलली पाहिजे याबाबत जाणून घेऊ.2 / 8झोपायचं असेल किंवा झोपून पुस्तक वाचणं किंवा मोबाईल बघणं असो. जास्तीत जास्त लोक आपला वेळ बेडवर जास्त घालवतात. अनेकदा आळसामुळे अनेक लोक बेडवरच जेवण करतात. बेडवरील चादरी, उशीचे कव्हर आपण कितीही छटकून वापरतो, पण त्यात कोट्यावधी कीटाणू, फंगस असतात.3 / 8काही दिवसांआधी याबाबत एक रिसर्च करण्यात आला. त्यातून जे समोर आलं ते वाचून तुम्ही लगेच तुमची बेडशीट, उशीचे कव्हर, उश्या लगेच बदलाल. रिसर्च दरम्यान काही लोकांनी नवीन बेडशीट आणि उश्या वापरल्या. 4 आठवडे त्यांचा वापर केला. जेव्हा 4 आठवड्यांनंतर या बेडशीट आणि उश्यांना मायक्रोस्कोपखाली बघण्यात आलं तेव्हा सगळ्यांना धक्का बसला.4 / 8या रिसर्चमधून असं आढळून आलं की, एक महिने जुन्या बेडशीटमध्ये साधारण 1 कोटींपेक्षा जास्त बॅक्टेरिया आढळले. बॅक्टेरियांची ही संख्या तुमच्या टूथब्रश स्टॅंडमध्ये असलेल्या बॅक्टेरियाच्या संख्येपेक्षा 6 पटीने अधिक आहे. तसेच 3 आठवडे जुन्या बेडशीटमध्ये 90 लाख बॅक्टेरिया, 2 आठवडे जुन्या बेडशीटमध्ये 50 लाख आणि 1 आठवडे जुन्या बेडशीटमध्ये 45 लाख बॅक्टेरिया होते.5 / 8सगळ्यात घाणेरडी आपली उशी असते. कारण आपला चेहरा आणि केस याच उशीवर असतात. यामुळे तेल, घाम आणि डेड स्कीन सगळ्यात जास्त उशीवरच असते. 4 आठवडे जुन्या उशीवर 1.2 कोटी बॅक्टेरिया असतात. त्यासोबतच एक आठवडे जुन्या उशीच्या कव्हरवर 50 लाख बॅक्टेरिया असतात.6 / 8हे बॅक्टेरिया आपणच आपल्या बेडवर आणतो. घाम आणि शरीरातून निघणारे द्रव्य थेट आपल्या बेडशीटवर जातात. हे द्रव्य बेडशीटच्या रेशोंमध्ये जाऊन फसतात आणि हळूहळू यात बॅक्टेरिया वाढू लागतात. अनेकदा आपण आंघोळ न करता थेट बेडवर जातो आणि आपल्यासोबत बाहेरची घाणही बेडशीट्समध्ये सोडतो.7 / 8डॉक्टरांचं असं मत आहे की, दर आठवड्यात आपण आपली बेडशीट आणि उशीचं कव्हर बदललं पाहिजे. हे गरजेचं नाही की, बेडशीटवर पडला असेल किंवा त्यातून वास येत असेल. अनेकदा चांगला वास येणाऱ्या बेडशीटमध्येही लाखो बॅक्टेरिया असतात.8 / 8जर बेडशीट आपण लगेच स्वच्छ केली नाही तर धोका आणखी वाढू शकतो. झोपताना आपल्या अनेक कोशिका डेट होत असतात. ज्या बेडमध्ये मिक्स होतात. हे नुकसानकारक आहे. जर तुम्ही यांना स्वच्छ करणार नाही तर बेडशीटमध्ये तुमच्या डेड सेल्स जमा होतात. आणखी वाचा Subscribe to Notifications