शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डायबिटीज रुग्णांना मिळणार दिलासा, शुगर तपासण्यासाठी रक्त काढावं लागणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 4:07 PM

1 / 8
डायबिटीजच्या रुग्णांना डॉक्टर ब्लड शुगरची तपासणी नियमितपणे करण्याचा सल्ला देतात. ब्लड शुगरद्वारे डायबिटीजची तपासणी केली जाते. या प्रक्रियेमध्ये ग्लूकोमीटरमध्ये रुग्णाचे बोट लावून रक्ताचा नमुना घेतला जातो. या वेदनापासून मुक्त होण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी एक अनोखा शोध लावला आहे.
2 / 8
शास्त्रज्ञांनी ब्लड शुगरची टेस्ट करण्यासाठी एक पद्धत आणली आहे. ज्यामध्ये बोटाला टोचण्याची गरज भासणार नाही. शास्त्रज्ञांनी एक पट्टी बनविली आहे, जी ब्लड शुगरची तपासणी लाळ अर्थात तोंडाच्या लाळेद्वारे करेल. यामुळे सुईमुळे होणाऱ्या वेदनापासून मुक्त होईल.
3 / 8
डायबिटीजच्या रुग्णांना आपले ब्लड लेव्हल तपासण्यासाठी सतत त्यांचे बोट ग्लूकोमीटरमध्ये चिकटवावे लागते. या प्रक्रियेत, रुग्णांना बर्‍याच वेळा वेदनांतून जावे लागते. हे टाळण्यासाठी, बरेच रुग्ण कधीकधी त्यांची टेस्ट पुढे ढकलतात.
4 / 8
ऑस्ट्रेलियाच्या न्यूकॅसल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर पॉल दस्तूर यांचे म्हणणे आहे की, या नवीन परीक्षेच्या पद्धतीमध्ये एंजाइम एम्बेड केलेले आहेत. ट्रान्झिस्टरमध्ये ग्लूकोज आढळू शकतो.
5 / 8
हे शरीरातील ग्लूकोजचे प्रमाण सांगते. या चाचणीत कोणतीही वेदना होत नाही. नवीन ग्लूकोज टेस्ट वेदनारहित तसेच कमी किमतीची आहे. त्यामुळे डायबिचीजच्या रुग्णांना चांगले परिणाम मिळतील, असे प्रोफेसर दस्तूर म्हणाले.
6 / 8
प्रोफेसर दस्तूर यांनी अल जजीराला सांगितले की, 'तोंडाच्या लाळेत ग्लूकोज आहे. या ग्लुकोजच्या एकाग्रतेद्वारे ब्लड ग्लुकोज देखील सहज शोधता येतो. आम्हाला एक अशी टेस्टिंग तयार करायची होती, जी कमी खर्चाची, सुलभ आणि तिची संवेदनशीलता स्टँडर्ड ग्लूकोज ब्लड टेस्टपेक्षा 100 पट जास्त असावी '
7 / 8
ट्रान्झिस्टरच्या इलेक्ट्रॉनिक साहित्यात शाई असते, कमी किंमतीत छपाईद्वारे त्याची टेस्ट केली जाऊ शकते. प्रोफेसर दस्तूर म्हणाले, 'आपण ज्या वस्तूंबरोबर काम करत आहोत, त्या असाधारण आहेत. हे इलेक्ट्रॉनिक इंक आहेत, जे इलेक्ट्रॉनिक साहित्य म्हणून कार्य करतात. परंतु फरक इतका आहे की रील-टू-रीलचा उपयोग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रिंट करु शकतो. जसे की आपण वर्तमानपत्र तयार करण्यासाठी उपयोग करतो.'
8 / 8
क्लिनिकल ट्रायल्समध्ये मंजुरी मिळताच त्यावर काम सुरू होईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. प्रोफेसर दस्तूर यांचे म्हणणे आहे की, कोरोना आणि एलर्जेन, हार्मोन आणि कॅन्सरचेही टेस्टिंग या तंत्राद्वारे करु शकतो.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स