health unhealthy habits which can make your heart sick increase risk of heart diseases
आरोग्य सांभाळा! 'या' 6 चुका ठरू शकतात हृदयासाठी घातक; हार्ट अटॅकसह अनेक आजारांचा धोका By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 4:37 PM1 / 13तरुणांमध्येही हृदयासंबंधीचे आजार खूप वेगाने होत आहेत. वयाच्या 30 ते 35 व्या वर्षी हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्टने मृत्यू झाल्याची प्रकरणेही समोर येत आहेत. हृदयाशी संबंधित समस्या अनेक कारणांमुळे सुरू होऊ शकतात. 2 / 13व्यायामाचा अभाव, सतत बसून काम करणं, चुकीचा आहार, प्रोसेस्ड फूड, कॅलरीयुक्त आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन इत्यादींमुळे देखील लोकांना हृदयविकाराचा त्रास होत आहे. हृदयाशी संबंधीत समस्या खूप धोकादायक ठरू शकतात. 3 / 13काही गोष्टींची वेळीच काळजी न घेतल्यास कार्डियक अरेस्टने व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. निरोगी हृदयासाठी काही आरोग्यदायी सवयी अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी निरोगी खाण्याच्या सवयी असणे, रोज व्यायाम करणे आवश्यक आहे. काही चुकीच्या समस्यांबाबत जाणून घेऊया...4 / 13everydeath.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, अनेक लोकांचे सिटींग जॉब असतात, ज्यामध्ये जास्त वेळ एकसारखे बसून राहावे लागते. सतत जास्त वेळ बसण्याची सवय किंवा सक्ती तुमचे हृदय आतून आजारी बनवते. 5 / 13अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, जे पुरेसे चालत नाहीत आणि दररोज पाच तास किंवा त्याहून अधिक बसून राहतात त्यांना सक्रिय जीवनशैली असलेल्या लोकांच्या तुलनेत हृदयविकाराचा धोका दुप्पट असतो. 6 / 13तुमच्याकडे डेस्क जॉब असला तरी, दर तासाला पाच मिनिटे चालत जा. तुमच्या दिनचर्येतील हा छोटासा बदल निरोगी राहण्यास आणि रक्ताचा प्रवाह व्यवस्थित ठेवण्यास मदत करू शकतो. याच्या मदतीने तुम्ही सतत बसून राहिल्याने हृदयावर होणारे नकारात्मक परिणाम टाळता येतात.7 / 13जास्त प्रमाणात दारूचे सेवन केले तर त्यामुळे ब्लड प्रेशर, स्ट्रोक, लठ्ठपणा आणि या सर्व समस्यांमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शरीराला अपायकारक असणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा.8 / 13तणावाखाली राहिल्याने शरीर एड्रेनालाईन सोडण्यास प्रवृत्त करते, ज्यामुळे शरीराच्या कार्यावर तात्पुरता परिणाम होतो. यामुळे हृदय गती आणि रक्तदाब वाढू शकतो. कालांतराने, अति ताणामुळे हृदयातील रक्तवाहिन्या खराब होतात.9 / 13हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. तणावापासून मुक्त होण्यासाठी दैनंदिन शारीरिक प्रक्रियांमध्ये स्वत: ला गुंतवा. यामुळे मानसिक ताण दूर होईल. दररोज सुमारे 30 मिनिटे व्यायाम करा.10 / 13दातांचे, हिरड्यांना बॅक्टेरियापासून वाचवण्यासाठी तुम्ही जेवणानंतर फ्लॉसिंग करता, पण तुम्हाला माहीत आहे का की फ्लॉसिंग केल्याने केवळ दात निरोगी राहत नाहीत, तर ते हृदयासाठीही महत्त्वाचे आहे.11 / 13शरीरासोबतच हृदयही दिवसभर मेहनत घेते. आपल्याला पुरेशी झोप न मिळाल्यास, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली आवश्यक विश्रांती घेऊ शकत नाही. त्यामुळे झोप पूर्ण करा. जागरण शरिरासाठी घातक ठरू शकतं. 12 / 13जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब होऊ शकतो, त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो. वरून जेवणात मीठ घालणे टाळावे. प्रक्रिया केलेले अन्न जसे की सूप, कॅन केलेला भाज्या, चिप्स, फ्रोजन फूड्स, इतर खारट स्नॅक्स टाळा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 13 / 13(टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.) आणखी वाचा Subscribe to Notifications