Health Winter Tips in Marathi: Winter food fenugreek leaves benefit health tips
हिवाळ्यात मेथीच्या सेवनाचे 'हे' ७ फायदे वाचून व्हाल अवाक्, आजारांपासून लांब राहण्याचा सोपा फंडा By manali.bagul | Published: December 04, 2020 3:07 PM1 / 8हिवाळा येताच बाजारात वेगवेगळ्या भाज्या दिसायला सुरूवात होते. प्रत्येक घरांमध्ये मेथीचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. काहींना भाजी तर काहीजणांना पराठ्यांमध्ये मेथी खायला आवडते मेथीच्या बीयांप्रमाणेच पानांचेही अनेक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला मेथीच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. 2 / 8डायबिटीससाठी फायदेशीर- मेथी टाईप १ टाईप २ डायबिटीससाठी फायदेशीर ठरते. मेथीमुळे शरीरातील इंसुलिनचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात आहारात मेथीचं सेवन करणं लाभदायक ठरेल.3 / 8ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या असेल त्यांना मेथीच्या पाण्याने आराम मिळेलच, सोबतच याने पचनक्रियाही चांगली होईल. इतकेच नाही तर पोटाशी संबंधित अनेक समस्याही याने दूर होतात. 4 / 8मेथीची पानं कोलेस्टेरॉल कमी करतात आणि यकृतामध्ये कोलेस्ट्रॉल तयार होण्यास प्रतिबंध करतात. मधुमेह असलेल्या एथेरोस्क्लेरोसिस रूग्णांसाठी देखील हे खूप फायदेशीर आहे. अभ्यासांनुसार, मेथीची पाने शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल) वाढवते आणि खराब कोलेस्ट्रॉल (एलडीएल) कमी करण्यासाठी कार्य करते.5 / 8अनेकांना झोप न येण्याची समस्या असते. अशांसाठीही मेथी फायदेशीर ठरते. मेथीच्या पाण्याने तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होते. यासाठी रात्रीच्या वेळी मेथी पाण्यात भिजवून ठेवून सकाळी पाणी गाळून सेवन करा. 6 / 8याशिवाय मातेच्या स्तनांमध्ये दूध येण्यासाठी मेथीचे सेवन फायदेशीर ठरते. मुलांच्या विकासासाठी आईचे दूध खूप महत्वाचे आहे. मेथी हा स्तनपानासाठी चांगला स्रोत आहे. म्हणून प्रसूतीनंतर महिलांना मेथीची पाने खाण्याचा सल्ला दिला जातो. भाजीव्यतिरिक्त, हर्बल चहा देखील बनविला जाऊ शकतो. मेथी पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे उत्पादन वाढविण्याचे काम करते. मेथीमध्ये फुरोस्टॅनोलिक सॅपोनिन्स असतात, जे टेस्टोस्टेरॉन वाढविण्यासाठी ओळखले जातात. 7 / 8मेथीचे सेवन हृदयाच्या आजारांसाठी फायदेशीर ठरते. हृदयाच्या रूग्णांसाठी नियमितपणे मेथीच्या बीया किंवा पानं खाणं फायदेशीर ठरते. मेथीमुळे कोलेस्टेरॉल कमी होते जे हृदयाच्या रूग्णांसाठी आवश्यक असते. मेथीची पाने औषधी वनस्पतींसारखे कार्य करतात जे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकच्या बाबतीत रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करतात. 8 / 8मेथी खाल्ल्याने शरीरातील जळजळ कमी होते. हे तीव्र खोकला, ब्राँकायटिस, त्वचेवरली इन्फेक्शन्स यासह अनेक त्वचेच्या रोगांशी लढायला मदत करते. आणखी वाचा Subscribe to Notifications