शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gudi Padwa 2018: गुढीपाडव्यानिमित्त हे पदार्थ ठरतील आरोग्यदायी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 5:22 PM

1 / 5
हिंदू सणांपैकी महत्त्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. धार्मिक आणि सामाजिक महत्त्वाबरोबरच गु़ढीपाडव्याचं नैसर्गिक महत्त्वही आहे. हा सण आरोग्यदायी ठरावा, यासाठी हे काही पदार्थ...
2 / 5
१) कडू-गोड - कडुनिंबाची पाने, मीठ, हिंग, जिरे, मिरे, ओवा यांचं एकत्रित मिश्रण करून गुढीपाडव्याच्या दिवशी याचं सेवन करावं. उत्तम आरोग्यप्राप्तीसाठी हे मिश्रण खाण्याची गरज असते. गुढीपाडव्यानिमित्त कडूगोड खाण्याची विशेष परंपरा आहे.
3 / 5
२) कैरीचं सार - गुढीपाडवा या सणादरम्यान कैरी येण्यास सुरुवात झालेली असते. त्यामुळे कैरीचं सार हा उत्तम पदार्थ असून त्यात नारळाचा रस, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर हे पदार्थ एकत्र करून प्यायल्यास उन्हाळ्याचा त्रास होत नाही.
4 / 5
३) कैरी भात - भातात चण्याची डाळ, उडीद डाळ, शेंगदाणे, कडुनिंब, साखर एकत्र करून त्यावर किसलेली कैरी घालून खावं. हा कैरीभात कोकणवासीयांचा गुढीपाडव्यादिवशीचा पसंतीचा पदार्थ आहे.
5 / 5
४) द्राक्षाची कोशिंबीर - द्राक्षांच्या बिया काढून त्यात तूप, मिरची, जिरे यांची फोडणी घालावी. थोडं दही घालून हे मिश्रण व्यवस्थित फेटावं. चवीला अतिशय रूचकर, पौष्टिक अशी ही कोशिंबीर आरोग्यासाठी उत्तम मानली जाते.
टॅग्स :Gudi Padwa 2018गुढीपाडवा २०१८Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स