Heart attack in bathroom : Know why does cardiac arrest happen in the bathroom
हार्ट अटॅक जास्तकरून बाथरूममध्ये आंघोळ करतानाच का येतो? चुकूनही करू नका या चुका.... By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 1:28 PM1 / 10आजकालच्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे लोकांना हार्ट अटॅकचा (Heart Attack) धोका वाढला आहे. तरूणांनाही आता हार्ट अटॅक येऊ लागले आहेत. देशात हार्ट अटॅकने दरवर्षी शेकडो लोकांचे जीव जातात. अनेकदा लोक वाचतातही. 2 / 10पण एक लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे अनेकदा लोकांना हार्ट अटॅक बाथरूममध्येच (Heart Attack In Washroom) येतात. अनेक केस अशा आहेत, ज्यात हार्ट अटॅक बाथरूममध्येच येतो.3 / 10पण कधी तुम्ही विचार केलाय का की असं का होतं? बाथरूममध्ये हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त का असतो? याबाबत हार्ट स्पेशालिस्टने खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, यामागचं कारण काय आहे. 4 / 10सामान्यपणे असं मानलं जातं की बाथरूममध्ये हार्ट अटॅकचा धोका असतो आणि ही बाब अनेक रिसर्चमधून समोर आली आहे. 5 / 10अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टमध्येही हे सांगण्यात आलं आहे की ११ टक्क्यांपेक्षा जास्त हार्ट अटॅक केस बाथरूममध्ये होतात. त्यासोबतच अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की बाथरूममध्ये हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो.6 / 10टीव्ही ९ ने दिलेल्या एका वृत्तानुसार, याबाबत मॅक्स हॉस्पिटलचे सीनिअर डायरेक्टर आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज कुमार म्हणाले की, बाथरूममध्ये जास्तकरून हार्ट अटॅक येण्याची अनेक कारणे असू शकतात. ज्या लोकांना आधीपासून हार्ट अटॅकसंबंधी आजार असतात. त्यांना याचा धोका जास्त असतो.7 / 10 डॉक्टर मनोज कुमार म्हणाले की, 'जेव्हा लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या होते आणि पोट साफ करण्यासाठी जास्त स्ट्रेन करतात तेव्हा याने त्यांच्या हार्टवर जास्त जोर पडतो. यावेळी हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. अशात आम्ही हार्ट पेशेंट्सना सल्ला देतो की, त्यांनी जास्त जोर लावू नये आणि बद्धकोष्ठता असेल तर त्यासंबंधी औषधे घ्यावी'.8 / 10 त्यासोबतच डॉक्टर मनोज कुमार म्हणाले की, 'आंघोळ करतानाही हार्ट अटॅकचा धोका वाढतो. जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीच्या हिशेबाने पाण्याचा वापर करत नाहीत. तेव्हा याचा धोका वाढतो.9 / 10जसे की, थंडीच्या दिवसात जास्त थंड पाण्याने समस्या निर्माण होऊ शकते. तसेच जेव्हा तुम्ही आंघोळ करताना अंग जास्त जोरात घासत असाल किंवा घाईघाईने आंघोळ करत असाल तर हार्टवर जास्त स्ट्रेस वाढतो. 10 / 10अशात प्रयत्न करावा की, तापमानाच्या हिशेबाने पाण्याचा वापर करावा आणि आरामात आंघोळ करावी. जास्त ताकद लावून अंग घासू नये. ज्या लोकांना आधीपासून हार्टची समस्या आहे त्यांनी याबाबत जास्त काळजी घ्यावी. आणखी वाचा Subscribe to Notifications