शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चिंताजनक! पुरुषांमध्ये हदयविकाराचा धोका सर्वात जास्त; जाणून घ्या, 'या' मागची नेमकी कारणं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 2:22 PM

1 / 11
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हदयासंबंधित आजारांचं प्रमाण वाढलं आहे. मागील काही काळात लोकांमध्ये हदयविकाराच्या घटना वाढताना दिसत आहे. हदयविकाराच्या झटक्याने किंवा हदयासंबंधित आजारांमुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाल्याचं दिसून येतं.
2 / 11
महिलांच्या तुलनेनं पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण अधिक असल्याचं पाहायला मिळतं. यामागचं एक कारण म्हणजे लाईफस्टाईल. याशिवाय महिला आणि पुरुषांची जैविक रचना हे देखील आहे.
3 / 11
याच कारणामुळे एकाच आजाराची पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये वेगवेगळी लक्षणं आढळतात. पुरुषांच्या हदयाचा आकार महिल्यांच्या हदयाच्या आकारपेक्षा तुलनेनं मोठा असतो. महिलांचं हदय पुरुषांच्या हदयापेक्षा जास्त वेगाने धडधडतं.
4 / 11
जर एखादी महिला तणावात असेल तर तिचा पल्स रेट वाढतो. तर जेव्हा पुरुष तणावात असतात, तेव्हा त्यांच्या हदयातील धमन्या आकुंचन पावतात, यामुळए ब्लड प्रेशर वाढतो. पुरुषांमधील हदयविकाराची कारणं जाणून घ्या.
5 / 11
हदयविकाराचं एक कारण कोलेस्ट्रॉल वाढणं हेही आहे. धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल प्लेक तयार होतात. कोलेस्ट्रॉल प्लेक तयार झाल्यावर रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. पुरुषांमध्ये सर्वात मोठ्या धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल प्लेक तयार होतात. यामुळेच हदयविकाराचा धोका वाढतो.
6 / 11
पुरुषांच्या शरीराची हालचाल कमी असते. जास्त करुन स्त्रिया सर्व कामांमध्ये सक्रिय असतात. याउलट पुरुषांचं काम जास्त बसण्याचं असतं. जसं की ऑफिसमध्ये एका जागी बसून काम, गाडी चालवणं या कामांमध्ये पुरुषांची अधिक हालचाल होत नाही.
7 / 11
पुरुषांच्या शरीराची जास्त हालचाल होत नाही परिणामी हदयविकाराचा अधिक धोका संभवतो. यामुळे योग्यवेळीच काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. जास्त त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
8 / 11
उच्च रक्तदाबाची समस्या हृदयविकाराचा झटका आणि हदयासंबंधित आजाराचं मोठं कारण आहे. पुरुष आणि स्त्रियांमध्ये रक्तदाबाची समस्या वेगळी असते. तरुणांमध्ये तरुणींपेक्षा जास्त उच्च रक्तदाब असतो. उच्च रक्तदाब हे पुरुषांमध्ये हदयविकाराचे मोठं कारण आहे.
9 / 11
कमी टेस्टोस्टेरॉनची पातळी तुमच्या शारीरिक क्षमतेशी संबंधित असते. यामुळे हृदयरोग आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे चयापचय चांगले राहते आणि उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. अशा परिस्थितीत टेस्टोस्टेरॉनची कमी पातळी तुम्हाला हृदयविकाराचा रुग्ण बनवू शकते.
10 / 11
भारतात मद्यपान आणि धुम्रपान करणाऱ्यांमध्ये पुरुषांचं प्रमाण अधिक आहे. मद्यपान आणि धुम्रपान यामुळ हदयासंबंधित रोगांचा धोका वाढतो. महिला पुरुषांपेक्षा कमी मद्यपान आणि धुम्रपान करतात. यामुळे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हदयविकाराचा धोका जास्त असतो.
11 / 11
(टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)
टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स