शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Heart Attacks Deaths : टेन्शन वाढलं! मुंबईमध्ये कोरोनापेक्षा जास्त जीवघेणा ठरतोय हार्ट अटॅक; दररोज १०० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 1:13 PM

1 / 9
देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. असं असताना आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कोरोनापेक्षा हार्ट अटॅक जास्त जीवघेणा ठरत आहे. एका आरटीआय रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.
2 / 9
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी जानेवारी ते जून दरम्यान मुंबईमध्ये हार्ट अटॅकने जवळपास १८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर याच दरम्यान कोरोनामुळे १०२८९ जणांनी जीव गमावला आहे. चेतन कोठारी यांनी विचारलेल्या प्रश्नाला बीएमसीने उत्तर दिलं आहे.
3 / 9
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी जानेवारी ते जून दरम्यान मुंबईमध्ये हार्ट अटॅकने जवळपास १८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर याच दरम्यान कोरोनामुळे १०२८९ जणांनी जीव गमावला आहे. चेतन कोठारी यांनी विचारलेल्या प्रश्नाला बीएमसीने उत्तर दिलं आहे.
4 / 9
आरटीआयमध्ये देण्यात आलेल्या उत्तरानुसार, २०१८ मध्ये हार्ट अटॅकने ८६०१ जणांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये ५८४९ जणांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये ५६३३ जणांनी जीव गमावला. पण २०२१ मध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्यांच आकडा हा तीन पटीने वाढला आहे.
5 / 9
गेल्या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत मुंबईमध्ये हार्ट अटॅकने १७८८० लोकांचा मृत्यू झाला. म्हणजेच जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
6 / 9
आरटीआयनुसार, कोरोनाआधी कॅन्सर सर्वात जीवघेणा आजार होता. कॅन्सरमुळे मुंबईमध्ये २०१८ मध्ये १००७३ आणि २०१९ मध्ये ९९५८ जणांचा मृत्यू झाला आहे. २०२१ मध्ये जानेवारी ते जूनमध्ये ६८६१ जणांचा मृत्यू झाला.
7 / 9
कोरोना डेथ कमेटीचे इनचार्ज डॉ. अविनाथ सूपे यांनी इंडियन एक्सप्रेसला हार्ट अटॅकने होणाऱ्या मृतांच्या संख्येत वाढ होण्यामागे तीन कारणं सांगितली आहेत. एक म्हणजे कोरोनातून बरं झाल्यावर थ्रोम्बोसिसमुळे असं होऊ शकतं.
8 / 9
दुसरं म्हणजे कोरोनामुळे रुग्णांना उपचार उशीरा मिळाले तर असं होऊ शकतं आणि तिसरं म्हणजे आता डेटा नीट रेकॉर्ड केला जात आहे. फक्त मुंबईतच नाही तर जगभरात हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढल्याचं सूपे यांनी म्हटलं आहे.
9 / 9
रिसर्चनुसार, कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांना हार्ट आणि ब्लड वेसेल्समध्ये त्रास जाणवतो. ज्यामध्ये क्लॉटिंग, हृदयाला सूज येणे, हार्ट फेल्योर याचा धोका वाढतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Healthआरोग्यHeart Attackहृदयविकाराचा झटकाcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई