शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आपल्या हृदयालाही असतो स्वत:चा एक मेंदू, वैज्ञानिकांनी तयार केलेला थ्रीडी नकाशा पाहून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 2:24 PM

1 / 10
आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे की, आपल्याला एक मेंदू असतो. पण तुम्हाला हे माहीत नसेल की, आपल्या हृदयाला सुद्धा एक स्वत:चा मेंदू असतो. ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी वैज्ञानिकांनी हृदयाचा एक थ्रीडी नकाशा तयार केलाय. ज्यात हे स्पष्ट झालं आहे की, हृदयाच्या आत त्याचा एक छोटा मेंदू असतो. हा मेंदू केवळ आणि केवळ हृदयासाठी काम करतो.
2 / 10
हृदयातील या मेंदूला इंट्राकार्डिएक नर्व्हस सिस्टीम (Intracardiac Nervous System - ICN) असे म्हणतात. हा मेंदू हृदयाचा बॉस असतो. म्हणजे हा मेंदू जे म्हणेल तेच हृदय करतो. हा मेंदू हृदयातील संचार व्यवस्था योग्यप्रकारे चालण्यासाठी मदत करतो.
3 / 10
ही नर्व्हस सिस्टीम हृदयाला फिट आणि निरोगी ठेवते. जेणेकरून ते योग्य प्रकारे काम करू शकेल. कधी किती रक्त पुरवठा करायचा आहे हे तो हृदयाला सांगतो. या मेंदूमुळेच हृदय अनेक आजारांपासून वाचतं.
4 / 10
फिलाडेल्फिया येथील थॉमस जॅफरसन युनिव्हर्सिटीच्या बायोलॉजिस्ट जेम्स शॉबर आणि त्यांच्या टीमने उंदराच्या हृदयावर अभ्यास केला. त्यानंतर हृदयाचे नाइफ इज स्कॅनिंग मायक्रोस्कोपीने फोटो घेतले.
5 / 10
नंतर या फोटोंच्या मदतीने हृदयाचा थ्रीडी मॅप तयार केला. या थ्रीडी मॅपमध्ये हृदयाचे सगळे भाग अगदी स्पष्टपणे दिसतात. प्रत्येक नस आणि अंग स्पष्ट दिसतो. इथे पिवळ्या रंगाचा मेंदू आढळून आला.
6 / 10
जेम्स शॉबर सांगतात की, या नकाशाद्वारे आम्ही माहिती मिळवू शकतो की, हृदयाचे रोग कोणत्या भागाला किती प्रभावित करतात. आम्ही त्यानुसार त्यावर उपचार करू शकू.
7 / 10
जेम्स यांनी सांगितले की, हृदयाचा मेंदू हृदयाच्या वरच्या भागात डाव्या बाजूला असतो. इथूनन हृदयाच्या डाव्या-उजव्या बाजूच्या नसांना कमांड पाठवली जाते.
8 / 10
हृदयाच्या डाव्या भागात मेंदूचे न्यूरॉन्स जास्त असतात. इथूनच ते त्यांचं काम करतात. आता जेम्सची टीम हे जाणून घेण्यात लागली आहे की, जेवढे पिवळ्या रंगाचे न्यूरॉन्स दिसले, ते सगळे वेगवेगळं काम करतात का? किंवा सगळे एकत्र एकच काम करतात?
9 / 10
जेम्स म्हणाले की, त्यांचा हा रिपोर्ट आयसायन्समध्ये 26 मे रोजी प्रकाशित झाला होता. हा नकाशा न्यूरोलॉजी आणि कार्डिओलॉजीमध्ये एकप्रकारे ब्रीजसारखं काम करेल. याच्या मदतीने जगभरातील डॉक्टर आणि वैज्ञानिक हृदयासंबंधी आजारांचा शोध घेऊ शकतील.
10 / 10
जेम्स म्हणाले की, त्यांचा हा रिपोर्ट आयसायन्समध्ये 26 मे रोजी प्रकाशित झाला होता. हा नकाशा न्यूरोलॉजी आणि कार्डिओलॉजीमध्ये एकप्रकारे ब्रीजसारखं काम करेल. याच्या मदतीने जगभरातील डॉक्टर आणि वैज्ञानिक हृदयासंबंधी आजारांचा शोध घेऊ शकतील.
टॅग्स :Healthआरोग्यResearchसंशोधनHeart Diseaseहृदयरोग