High blood sugar can affects skin health
डायबिटीसचे संकेत असू शकतात त्वचेच्या या समस्या, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात! By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 3:31 PM1 / 7Diabetes Symptoms : डायबिटीस हा एक गंभीर आजार असून तो कधीही बरा होत नाही. कारण हा आजार मुळापासून नष्ट करणारं कोणतंही औषध नाही. हा आजार केवळ कंट्रोल केला जाऊ शकतो. भारत डायबिटीसची राजधानी मानला जातो. जर तुमची ब्लड शुगर नेहमीच अनियंत्रित राहत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. डायबिटीसचे अनेक लक्षणं शरीरावर दिसतात. त्वचेवरही काही लक्षणं दिसतात. जी वेळीच ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.2 / 7त्वचेच्या अनेक समस्याही डायबिटीसचं कारण बनू शकतात. त्वचेवर लालसरपणा आणि खाज सामान्य फारच कॉमन आहे. पण अनेकदा याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.3 / 7डॉक्टरांनुसार, डायबिटीससारख्या क्रॉनिक आजारात त्वचेसंबंधी आजारांचाही धोका जास्त राहतो. डायबिटीसच्या काही केसेमध्ये त्वचेच्या समस्या गंभीर होऊ शकतात. अशात तुमची ब्लड शुगर लेव्हल नेहमीच अनियंत्रित राहत असेल तर सावध होणं गरजेचं ठरतं. 4 / 7जखम झाल्यावर अल्सरही असू शकतो. अशाप्रकारच्या केसेस जास्त बघायला मिळत नाहीत. डायबिटीसच्या साधारण ३०० रूग्णांपैकी केवळ एकाच रूग्णाला अशाप्रकारचा आजार होऊ शकतो. त्यामुळे डायबिटीसबाबत सावध राहिलं पाहिजे.5 / 7त्वचेवर चट्टे डायबिटीसच्या रूग्णांवर अनेकदा दिसतात. हात-पायांची बोटे, पूर्ण हात-पायांवर चट्टे येतात. हे चट्टे पांढरे असतात, पण त्यात वेदना होत नाही. हे चट्टे दोन ते तीन आठवड्यानंतर आपोआप बरे होतात. पण हा संकेत असू शकतो की, तुमची ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल नाही. याकडे दुर्लक्ष करू नये.6 / 7डायबिटीसच्या रूग्णांना डिजिटल स्केलेरोसिसचाही धोका राहतो. यात तुमची त्वचा सामान्यापेक्षा जास्त जाड होते. टाइप १ आणि टाइप २ डायबिटीसने ग्रस्त व्यक्तींमध्ये हाता-पायांच्या बोटांची त्वचा जाड किंवा मेणासारखी होऊ शकते. ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल न राहणाऱ्या लोकांना ही समस्या होते.7 / 7नेक्रोबायोसिस म्हणजे कोशिका डेड होणेही डायबिटीसचा संकेत असू शकतो. यात त्वचेवर छोटे लाल डाग येतात. जे हळूहळू वाढतात आणि चमकदार दिसतात. यात त्वचा पातळ होऊ शकते आणि फाटूही शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications