High oxalate foods to avoid that forms kidney stones
किडनी स्टोन झाल्यास कोणत्या पदार्थांचं कमी करावं सेवन? दुर्लक्ष कराल तर करावी लागेल सर्जरी! By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 10:43 AM1 / 8Kidney Stone : किडनी स्टोनची समस्या असह्य वेदना देणारी असते. अनेकदा तर स्टोनचा आकार वाढल्यावर थेट सर्जरीची गरज पडते. लोक ही समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे उपायही करतात. यासोबतच आणखी एक गोष्ट महत्वाची ठरते. ती म्हणजे आहार. किडनी स्टोन झाल्यावर काय खावे आणि काय खाणं टाळावे हे अनेकांना माहीत नसतं. जर या स्थितीत चुकीच्या पदार्थांचं सेवन केलं गेलं तर किडनी स्टोनची समस्या अधिक वाढू शकते. अशात ही समस्या वाढू नये म्हणून यादरम्यान काय खाणं टाळावं ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.2 / 8किडनी स्टोनची समस्या कुणालाही होऊ शकते आणि याचा सगळ्यात कॉमन प्रकार कॅल्शिअम ऑक्सालेटपासून तयार होणारा स्टोन आहे. जर तुमच्या किडनीमध्ये किंवा पाठीत वेदना होत असेल तर किडनीमध्ये स्टोन असू शकतो. अशात ऑक्सालेट असलेल्या पदार्थांचं सेवन कमी केलं पाहिजे किंवा टाळलं पाहिजे. जर यांचं सेवन केलं गेलं तर स्टोनचा आकारही वाढतो आणि संख्याही वाढते. अशात तुम्हाला सर्जरीची गरज पडू शकते. 3 / 8नॅशनल किडनी फाउंडेशननुसार, सगळे किडनी स्टोन एकसारखे नसतात. याचा सगळ्यात कॉमन प्रकार ऑक्सालेट स्टोन आहे. त्यानंतर यूरिक अॅसिडमुळे होणारा किडनी स्टोनचा नंबर येतो. जास्तीत जास्त लोकांना असं वाटतं की, कॅल्शिअम ऑक्सालेटपासून तयार होणाऱ्या स्टोनमध्ये कॅल्शिअमची भूमिका असते. पण हे चुकीचं आहे.4 / 8जास्त मीठ खाणाऱ्या लोकांच्या किडनीमध्ये स्टोन होण्याचा धोका अधिक राहतो. कारण मिठात सोडिअम असतं, ज्यामुळे लघवीमध्ये कॅल्शिअमचं प्रमाण वाढतं आणि हे किडनीमध्ये येऊन जमा होतं व किडनीमध्ये स्टोन तयार होतो. त्यामुळे हाय सोडिअमचं सेवन करू नये. 5 / 8किडनी स्टोनपासून बचाव करण्यासाठी कॅल्शिअम असलेले फूड्स कमी खाऊ नये. कारण नॅशनल किडनी फाउंडेशननुसार, असं केल्याने ही समस्या वाढण्याचा जास्त धोका असतो. त्यामुळे कॅल्शिअम असलेल्या पदार्थांचं सेवन सुरू ठेवा. 6 / 8नॅशनल किडनी फाउंडेशननुसार, शेंगदाणे, पालक, बीट, स्वीस चार्ड, चॉकलेट आणि रताळ्यामध्ये ऑक्सालेट भरपूर असतं. ज्या लोकांना कॅल्शिअम ऑक्सालेट किडनी स्टोन आहे, त्यांना या पदार्थांचं सेवन कमी करावं. याने फायदा मिळेल आणि जेव्हाही खाल तेव्हा कॅल्शिअम फूड्ससोबत खावेत.7 / 8नॅशनल किडनी फाउंडेशननुसार, तुम्ही कॅल्शिअम फूड्स आणि ऑक्सालेट फूड्स सोबत खावेत. असं केल्याने हे दोन्ही तत्व पोट किंवा आतड्यांमध्ये एकत्र जुळतात आणि किडनीमध्ये जमा होण्याचा धोका कमी असतो.8 / 8कंबरेच्या एका बाजूला वेदना होणे, मांड्या दुखणे, लघवीतून रक्त येणे, थंडी वाजणे, ताप येणे, मळमळ, उलटी होणे आणि लघवीचा रंग बदलणे ही किडनी स्टोनची लक्षणं असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications