शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घशात खवखव, आवाज बंद झालाय? 'हे' नॅचरल उपाय करून लगेच मिळेल आराम!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 9:24 AM

1 / 9
Hoarseness Home Remedies : सध्या सगळीकडेच जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा धोकाही वाढतो. या दिवसांमध्ये सर्दी-खोकला होणं तर फारच कॉमन आहे. तसेच अनेकांचा आवाजही बसतो. घशात खवखवही होते. घशाची ही समस्या फार त्रासदायक ठरते. घसा बसला की, आवाज कमी येतो किंवा अजिबातच येत नाही. घशात वेदनाही होतात.
2 / 9
पावसाळ्यात वातावरणात ओलावा आणि तापमानात बदल होत असल्याने घशात इन्फेक्शनचा धोका वाढतो. अशात या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही नॅचरल उपाय घरीच करू शकता. हे उपाय काय आहेत तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
3 / 9
आल्याच्या रसात थोडं मध टाकून सेवन करा. याने घशातील सूज कमी होते आणि घशाला आराम मिळतो. दोन्ही गोष्टी उष्ण असल्याने घशाची समस्या लगेच दूर होते.
4 / 9
तुळशीची काही पाने पाण्यात उकडा आणि याचं दिवसातून दोन वेळा सेवन करा. याने घशातील सूज आणि खवखव कमी करण्यास मदत मिळते.
5 / 9
एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून सेवन करा. याने घशातील सूज कमी होईल आणि घशाला आराम मिळेल.
6 / 9
ज्येष्ठमध चाऊन खाल्ल्याने घशातील सूज आणि खवखव कमी होण्यास मदत मिळते. हे दिवसातून दोन ते तीन वेळा चावा.
7 / 9
एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिक्स करा. याचं हळूहळू सेवन करा. याने घशाला आराम मिळेल.
8 / 9
गरम पाण्याची वाफ घेतल्याने बसलेला घसा बरा होईल. पाण्यात काही थेंब नीलगिरी किंवा पुदीन्याचं तेल मिक्स करा. याने घशातील सूज कमी करण्यास मदत मिळेल.
9 / 9
लवंग खाल्ल्याने घशाला आराम मिळतो. याने घशातील सूज आणि खवखव कमी होण्यास मदत मिळते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य