शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Holi 2022: चेहरा, हात रंगला असेल; या 'पाच' हर्बल उपायांनी असा घालवा होळीचा शरीरावरील रंग; फायदा होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 2:26 PM

1 / 8
एव्हाना तुमची होळी, धुळवड खेळून झाली असेल, कोणाचा डोळ्यात, कानात रंग उडाला असेल. उष्णतेचे दिवस घामामुळे एकमेकांवर उडालेले रंग आता शरीरात देखील भिनले, मुरले असतील. आता तुमची खरी कसरत सुरु होणार आहे.
2 / 8
त्वचेमध्ये, हातावर, चेहऱ्यावर मानेवर तुमच्या काळा, निळा, हिरवा, लाल असे नानाविध रंग उमटलेले असणार हे नक्की. ते घालविण्यासाठी तुम्ही साबन लावला असनार... धोते रहो, धोते रहो केले तरी काही रंग गेलेला नसणार. आता हे डाग घालवायचे तरी कसे? यासाठी काही दिवस लागणार आहेत.
3 / 8
हे डाग घालविण्यासाठी तुम्हाला आम्ही काही साईड इफेक्ट नसलेले पर्याय सांगणार आहोत. घरगुतीच म्हणजेच या वस्तू तुम्हाला घरातच सापडणार आहेत. त्यांचा साईड इफेक्टही नाही आणि त्वचेला फायदादेखील होणार आहे. शिवाय डाग जाण्यास मदत देखील होणार आहे.
4 / 8
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सॅलडसाठी वापरल्या जाणार्‍या काकडीचा वापर रंग घालवण्यासाठीही केला जातो. रंगापासून मुक्त होण्यासाठी काकडीच्या रसात थोडेसे गुलाब पाणी आणि एक चमचा व्हिनेगर मिसळून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर अंगावर लावा. थोड्या वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा. चेहऱ्याचा रंगही निघून जाईल आणि त्वचेलाही चमक येईल.
5 / 8
लिंबू आणि बेसन वापरून तुम्ही अंगावरील रंग सहज साफ करू शकता. चेहऱ्यावरील होळीचा रंग काढण्यासाठी बेसनामध्ये लिंबू आणि दूध मिसळून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. पेस्ट चेहऱ्यावर १५-२० मिनिटे राहू द्या. थोड्या वेळाने कोमट पाण्याने चेहरा धुवा.
6 / 8
जवाचे पीठ आणि बदामाच्या तेलाचा वापर शरीरावरील रंग घालविण्यासाठी करतात. हे तेल त्वचेवर लावल्याने होळीचा रंग साफ करता येतो. याशिवाय दुधात थोडी कच्ची पपई, मुलतानी माती आणि थोडे बदाम तेल मिसळा. साधारण ३० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.
7 / 8
रंग घालवण्यासाठी मुळा हा रामबाण उपाय आहे. मुळ्याचा रस काढून त्यात दूध, बेसन आणि मैदा एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहरा स्वच्छ होतो. केवळ चेहऱ्यावरच नाही तर शरीराच्या कोणत्याही भागावरचा रंग घालवायचा असेल तरीही ही पेस्ट वापरता येते.
8 / 8
चेहऱ्यावर डाग पडले असतील आणि रंगही मुरला असेल तर संत्र्याच्या सालीसह मसूर आणि बदाम दुधात बारीक करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट त्वचेवर लावल्यानंतर थोड्य़ा वेळाने स्वच्छ धुवा. तुमची त्वचा स्वच्छ होईल आणि ती चमकेल.
टॅग्स :Holiहोळी 2022Healthआरोग्य