Home ACs dont pose coronavirus threat know who to take care of it kkg
CoronaVirus: एसीमुळे वाढतो कोरोनाचा धोका?; जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 5:30 PM1 / 10कोरोनाचा विषाणू थंड वातावरणात बराच काळ टिकतो. त्या तुलनेत उष्ण वातावरणात तो टिकत नाही. त्यामुळे एसीचा वापर टाळावा, असे मेसेज सध्या व्हॉट्स ऍपवर फिरताहेत. 2 / 10एप्रिल महिना सुरू झाल्यानं उकाडा वाढला आहे. मात्र कोरोनामुळे अनेकांना एसी सुरू करण्याची भीती वाटते.3 / 10एका रूममध्ये एसी असेल तर त्या माध्यमातून कोरोना पसरू शकतो याविषयी कुठलाही पुरावा नाही व याची शक्यताही नाही. पण सेंट्रल एसी ज्यातून सगळीकडे फिरून हवा जाते, याविषयी अजून निश्चित माहिती नाही.4 / 10सेंट्रल एसीपेक्षा वैयक्तिक रूमसाठीचा एसी चांगला. मात्र वापरण्याअगोदर हा एसीही स्वच्छ करून घ्यावा. अस्वच्छ एसीमुळे दमा, ऍलर्जिक खोकला, सर्दी वाढते व ताप-सर्दी-खोकला व त्यातच लिजोनेल्ला, असीनॅटोबॅक्ट हे निमोनिया करणारे बॅक्टेरिया एसीमधून पसरतात.5 / 10उन्हाळा नुकताच सुरू झाल्यानं या दिवसात अचानक अनेक महिने बंद असलेले एसी सुरू होतात. बरेचदा हे एसी स्वच्छ न करता चालू केले जातात. 6 / 10बऱ्याच दिवसांनी एसी सुरू केल्यानं अनेक दिवस अडकलेले ऍलर्जीस बाहेर पडतात आणि दमा, ऍलर्जी बळावते. अस्वच्छ एसीमध्ये लिजोनेल्ला, असीनॅटोबॅक्ट हे निमोनियाची लागण करणारे जंतू असतात हे वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झालंय.7 / 10एसीची स्वच्छता करताना योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सर्वप्रथम एसीचे स्वीच बंद असल्याची खात्री करून घ्या. एसी उघडण्याआधी चेहरा, डोके झाकून घ्या. मास्क व गॉगलचा वापर करा. 8 / 10एसीतील जाळी काढून पाण्यामध्ये दोन तास भिजवा. त्यानंतर जुन्या टूथब्रशनं ती स्वच्छ घासून घ्या. त्यानंतर एक दिवस ती उन्हात वाळू द्या.9 / 10एसीचा आतील भाग हेअर ड्रायरनं गरम हवा मारून ५ ते १० मिनिटं स्वच्छ करून घ्या. यावेळी चेहरा शक्यतो दुसऱ्या बाजूला घ्या आणि हेअर ड्रायर फिरवताना उडणारी धूळ डोळे, नाका-तोंडात जाणार नाही, याची काळजी घ्या. यासाठीच मास्क व गॉगलचा वापर करा. 10 / 10यानंतर एसीची जाळी व्यवस्थित बसवा आणि मग एसी सुरू करा. यानंतर दर महिन्यातून एकदा जाळी झटकून स्वच्छ करायला विसरू नका. आणखी वाचा Subscribe to Notifications