शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Home remedy for upset stomach :पावसाळ्यात 'या' गोष्टी पाण्यात टाकून प्या, जळजळ, अपचन, वात, पोटदुखीपासून सुटका मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 10:50 AM

1 / 6
आजकाल आपण छोट्या मोठ्या दुखण्यावर मेडिसिन घेऊन मोकळे होतो. त्यामुळे तात्पुरते बरे वाटते, पण काही समस्या मुळापासून नष्ट होत नाहीत. अशा घरगुती उपाय कामी येतात आणि दीर्घकाळ आराम देतात. जाणून घेऊया त्या उपायांविषयी...
2 / 6
पोट निरोगी ठेवण्यासाठीही पुदिना खूप उपयुक्त आहे. जेवण झाल्यावर ४ ते ५ पुदिन्याची पाने चावून खाण्याची सवय लावा. नुसती पुदिन्याची पाने खायला आवडत नसेल, तर कोमट पाणी करून त्यात पुदिन्याची पाने टाका, जेणेकरून पुदिन्याचा अर्क पाण्यात उतरेल आणि पाण्याचा गुणधर्म तुमच्या शरीराला लाभदायी ठरेल.
3 / 6
रताळे आपण फार तर उपासाला भाजी करून नाहीतर उकडून खातो. पण हे कंद शरीराला अत्यंत उपयोगी असल्याने आठवड्यातून दोन चार वेळा उकडलेली रताळी नुसती खायलासुद्धा हरकत नाही. गोडसर चव आणि त्यावर चिमूटभर मिठाची पेरणी केली तरी मधल्या वेळेची भूक सहज भागवता येईल. रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते पोटाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी केळ्याइतकेच रताळेही गुणकारी ठरेल.
4 / 6
पूर्वी घरी दारी नारळाच्या बागा असल्यामुळे लोक हवं तेव्हा नारळाचे पाणी पीत असत. मात्र आता एका शहळ्यामागे किमान ५०-६० रुपये मोजावे लागत असल्याने लोक खर्चिक बाब म्हणून नारळाचे पाणी पिणे टाळतात. पण लक्षात घ्या, नारळ पाणी महाग वाटत असले तरी पोटाशी संबंधित विकारांवर ते अतिशय गुणकारी आहे. कारण त्यात पोटॅशियम आणि सोडियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलित करतात. नारळाच्या पाण्यामुळे डिहायड्रेशनच्या समस्येपासूनही आराम मिळतो. पोट छान राहतं.
5 / 6
पोटदुखीवर त्वरित स्वस्त आणि मस्त उपाय म्हणजे लिंबू पाणी! अपचनामुळे तोंडाची गेलेली चव आणि पोटात गुडगुड होत असताना लिंबू पाण्याने तत्काळ आराम पडतो. जुलाब झाले असतील तरीदेखील काळ्या कॉफीमध्ये लिंबाचा रस घालून प्यायल्यास जुलाब नियंत्रणात येतात. दैनंदिन जीवनातही रोज सकाळी कोमट पाणी आणि अर्ध्या लिंबाचा रस घेतल्यास दिवसभर ताजेतवाने वाटते आणि लिंबाच्या रसाने आतडेही चांगली साफ होते.
6 / 6
जर तुम्हाला तुमचे पोट खराब होण्यापासून वाचवायचे असेल तर जेवल्यानंतर ओवा पाणी प्या. एकतर ओवा चावून मग पाणी प्या किंवा पाणी गरम करताना त्यात ओवा घालून ओव्याचा अर्क उतरलेले पाणी गाळून प्या. असे केल्याने तुमची पचनक्रिया चांगली होईल आणि चयापचयाची क्रिया सुधारेल.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स