How dangerous can the delta plus variant of coronavirus be for children?
Delta Plus : लहान मुलांसाठी किती घातक आहे कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट, काय म्हणाले एक्सपर्ट? By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 12:27 PM1 / 9भारतात कोरोना व्हायरसच्या नव्या केसेस आता कमी झाल्या आहेत. मात्र, कोरोना महामारीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अजूनही चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन तांडव घातला. याचं सर्वात मोठं कारण होतं कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट. 2 / 9कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट इतर सर्व व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त घातक ठरला. ज्यामुळे देशाला अशी भयानक स्थिती बघायला मिळाली. अशातच आता देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट समोर आला आहे. 3 / 9कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त घातक आहे. कारण तो वॅक्सीन आणि मजबूत इम्यूनिटीवरही भारी पडत आहे. मात्र, हा किती संक्रामक आहे याची माहिती मिळवणं सुरू आहे. 4 / 9कोरोना व्हायरसचा डेल्टा प्लस व्हेरिएंट संपूर्ण मानव जातीसाठी फार धोकादायक ठरू शकतो. अशात हा व्हेरिएंट लहान मुलांसाठी किती नुकसान पोहोचवेल हे जाणून घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत केवळ इतकंच ऐकायला मिळालं की, कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट लहान मुलांना प्रभावित करू शकतो.5 / 9अशात मोठा प्रश्न हा आहे की, डेल्टा प्लस व्हेरिएंट लहान मुलांसाठी किती धोकादायक होऊ शकतो. याबाबत टीव्ही ९ ने सिंघल मेडिकल सेंटरचे डायरेक्टर आणि सीनिअर पीडियाट्रिशिअन डॉक्टर सुनील सिंघल यांच्यासोबत बातचीत केली. डॉ. सिंघल म्हणाले की, 'असं मानलं जात आहे की, डेल्टा प्लस व्हेरिएंट लहान मुलांना प्रभावित करू शकतो. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या व्हेरिएंटच्या केसेस सापडल्या आहेत. 6 / 9या ठिकाणांवर लहान मुलेही संक्रमित झाले आहेत. मात्र, प्रमाण कमी आहे. हे प्रमाण ६ ते ८ टक्के आहे. एक चांगली बाब म्हणजे यात संक्रमण दर जास्त आहे. पण मृत्यूदर कमी आहे. याला आरामात कंट्रोल केलं जाऊ शकतं'.7 / 9डॉ. सुनील सिंघल म्हणाले की, डेल्टा प्लस व्हेरिएंटने संक्रमण दर वाढू शकतो. पण यात गंभीर आजार आणि मृत्यूदराची शक्यता कमी आहे. मला वाटतं की, आपल्या देशात हा व्हेरिएंट कदाचितच घातक ठरेल. आम्ही बघतो आहोत की, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएंटच्या केसेस एकूण केसेसपैकी ६ ते ८ टक्के आहेत. 8 / 9डेल्टा प्लस व्हेरिएंट भारतातील काही ठिकाणी आढळून आला आहे. आम्हाला आशा आहे की, कोरोना व्हायरसचा हा व्हेरिएंट जास्त घातक नसेल आणि जर घातक असला तरी आम्ही याला रोखण्यात यशस्वी ठरू.9 / 9दरम्यान काही वैज्ञानिकांनी सल्ला दिला आहे की, कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी काही नवीन करण्याची गरज नाही. आपल्याला आधीसारखाच मास्क लावायचा आहे, सोशल डिस्टंसिंगचं पालन करायचं आहे, नियमितपणे हात धुवायचे आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायचं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications