How elephant become big and cancer resistant at science
हत्तींना कॅन्सर का होत नाही? रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा... By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 10:35 AM1 / 11जे जीव किंवा प्राणी आकाराने मोठे असतात आणि जास्त आयुष्य जगतात त्यांना कॅन्सर होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. असं होण्यामागचं कारण म्हणजे जेनेटिक म्यूटेशनवेळी प्रत्येक कोशिका फार वेगाने रिप्रोड्यूस करते. अशात ट्यूमर तयार होतो. म्हणजे मोठ्या आकाराचे जीव ज्यांच्या शरीरात जास्त कोशिका असतात त्यांना कॅन्सरचा धोका जास्त असतो. पण हत्ती हे प्राणी आकाराने इतके मोठे असूनही त्यांना कॅन्सर कधीच होत नाही. चला जाणून घेऊ याचं कारण....2 / 11एका नव्या रिसर्चनुसार, हत्तींमध्ये असे जीन्स असतात जे ट्यूमर तयार होण्यापासून रोखतात. त्यामुळे हत्तीला विचित्र स्थितीतच कॅन्सर होतो नाही तर होत नाही. सामान्यपणे हत्तींना कॅन्सर होत नाही. पण ही प्रक्रिया केवळ हत्तींमध्ये सीमित नाही. त्यांच्या पूर्वजांमध्येही हीच स्थिती होती.3 / 11हत्तींचे पूर्वज केप गोल्डन मोल्स आणि एलिफॅंट श्रूसमध्ये ट्यूमरला रोखणारे जीन्स होते. यावरून हे स्पष्ट होतं की, हत्तींनी आपल्या शरीरात असे जीन्स विकसीत केले ज्यामुळे त्यांना कॅन्सर फार क्वचित होतो.4 / 11हा रिसर्च नुकताच elife जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. हा रिसर्च यूनिव्हर्सिटी ऑफ बफेलोच्या विंसेंट लिं आणि यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया्या जुआन मॅन्युअल वाजक्वेज यांनी केला. लिंच म्हणतात की जसा आपल्या शरीराचा आकार वाढतो तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. कारण शरीरात जास्त कोशिका असतात. जर काही कारणाने कोशिकांनी रिप्रोडक्शन प्रोसेस वेगाने केली तर जेनेटिक म्यूटेशनमुळे ट्यूमर होण्याचा धोका असतो. 5 / 11लिंच यांनी सांगितले की, ही बाब प्रत्येक प्रजातीच्या जीवांसाठी एकसारखी नाही. इवोल्यूशनरी मेडिसिन आणि कॅन्सर बायोलॉजीने ही बाब सिद्ध केली आहे की, कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. आम्हाला आमच्या रिसर्चमध्ये आढळून आलं की, कशाप्रकारे हत्ती त्यांचे वर्तमान नातेवाईक आणि पूर्वज कॅन्सरला रोखू शकत होते. ते कशाप्रकारे कॅन्सर रेसिसटेंट होते.6 / 11लिंच म्हणाल्या की, आमच्याकडे काही जुने रिसर्च होते. ज्यात TP53 नावाचा ट्यूमर सप्रेसर म्हणजे ट्यूमरला दाबणाऱ्या जीन्सची जबाबदारी होती. आमच्या मनात प्रश्न हा होता की, काय हत्तींमध्ये असे ट्यूमरला दाबणारे जीन्स होते. अभ्यासानंतर समोर आलं की, त्यांच्याकडे ट्यूमर दाबणारे जीन्स खूप सारे असतात. त्यामुळेच हत्ती कॅन्सरपासून वाचतात.7 / 11आता हत्तींच्या नातेवाईकांची टेस्ट करण्याची वेळ आली. असं तर नाही ना की केवळ हत्तींमध्येच हे जीन्स मिळतात. अशात असं समोर आलं की, हत्तींमध्ये ट्यूमरला दाबणारे जीन्स आहेत. ते DNA रिपेअर करणे, ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी करणे, कोशिकांचा विकास, वय आणि मृत्यूपर्यंतही प्रक्रिया सांभाळतात.8 / 11जुआन मॅन्युअल वाजक्वेज म्हणाले की, आम्हाला या रिसर्चमधून एक गोष्ट समजली की, कशाप्रकारे भविष्यात अशाप्रकारच्या जीन्सच्या मदतीने कॅन्सरवर उपचार केला जाऊ शकतो. आम्ही हत्तींशी संबंधित जीवांचाही अभ्यास केला. तेव्हा समोर आलं की, केप गोल्डेन मोल्स, एलिफंट श्रूस, रॉक हायरेक्सेस, मानाटी लुप्त झालेले वूली मॅमथ आणि मास्टोडोन्स यांच्यातही अशे जीन्स होते.9 / 11जुआन यांनी सांगितले की, ट्यूमरला दाबणारे जीन्स एशियन, आफ्रिकन सवाना आणि आफ्रिक जंगली हत्तींमद्ये आढळतात. पण हैराण करणारी बाब ही आहे की, यांच्यासारखेच इतर मोठे जीव जसे की, वूली मॅमथ आणि मास्टोडोन्स कसे लुप्त झालेत.10 / 11लिंच म्हणाल्या की, याच कॅन्सरला दाबणाऱ्या जीन्समुळेच हत्ती आणि त्यांच्याशी संबंधित जीव इतक्या मोठ्या आकाराचे झाले. यांना क्वचितच कॅन्सर होतो. याचा अर्थ हा आहे की, अशाप्रकारचे जीन्स भविष्यात एखाद्या छोट्या जीवात विकसीत झाले तर ते कॅन्सरपासून वाचतील आणि त्यांचा आकारही मोठा होईल.11 / 11लिंच म्हणाल्या की, याच कॅन्सरला दाबणाऱ्या जीन्समुळेच हत्ती आणि त्यांच्याशी संबंधित जीव इतक्या मोठ्या आकाराचे झाले. यांना क्वचितच कॅन्सर होतो. याचा अर्थ हा आहे की, अशाप्रकारचे जीन्स भविष्यात एखाद्या छोट्या जीवात विकसीत झाले तर ते कॅन्सरपासून वाचतील आणि त्यांचा आकारही मोठा होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications