शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भात खाणं बंद न करताही वजन कमी करू शकता, फक्त वापरा 'ही' पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 10:19 AM

1 / 9
वजन कमी करण्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा जवळपास सर्वांनाच प्रश्न पडतो की, भात खावा की नाही. कारण अनेकजण वजन कमी करण्यासाठी भात न खाण्याचा सल्ला देतात. कारण यात कॅलरी आणि स्टार्च सर्वात जास्त असतं. बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की, भातात फार कमी फॅट असतं. भात सहज पचवला जाऊ शकतो आणि यात व्हिटॅमिन बी चं अधि प्रमाण असतं. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि भात खाणंही सोडायचं नसेल तर भात खाण्याची योग्य पद्धत तुम्ही माहीत असायला हवी.
2 / 9
डायटिंग करताना कसा खावा भात - वजन कमी करणारे लोक आणि फिटनेसबाबत सजग लोक व्हाइट राइस खाणं टाळतात. वजन कमी करण्यासाठीच्या नियमाबाबत सांगायचं तर तुम्ही दिवसभर किती कॅलरी इनटेक केल्या, त्यापेक्षा किती कॅलरी बर्न केल्या यावर अवलंबून असतं. भातात कॅलरी भरपूर असतात, पण भात जेवणाच्या ताटातून पूर्णपणे गायब करण्याची गरज नाही.
3 / 9
किती खावा भात - प्रयत्न करा की, दोन जेवणांपैकी एकातच भात असावा. याने तुमचं कॅलरी इनटेक कमी होईल. कारण भातात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण आधीपेक्षा जास्त होतं. त्यामुळे आहारात दुसरा असा कोणताही पदार्थ घेऊ नका ज्यात कार्बोहायड्रेट्स जास्त असतील.
4 / 9
भाज्यांसोबत शिजवा भात - तुम्ही फक्त भात खाल्ला तर तुम्ही लवकर भूक लागू शकते. भातात जर तुमच्या आवडीच्या भाज्या टाकल्या तर फायदा अधिक होईल. भाज्यांमध्ये भरपूर प्रोटीन आणि फायबर असतं. ज्याने तुमचं पोट जास्त वेळासाठी भरलेलं राहणार. भात हेल्दी करण्यासाठी त्यात बींस, शिमला मिरची, ब्रोकोली, पनीर टाका.
5 / 9
भात फ्राय करू नका - भात फ्राय करू नका आणि क्रीमसोबतही मिश्रित करू नका. तांदूळ पाण्यासोबत उकडूनची शिजवा. तांदूळ शिजल्यावर त्यातील अतिरिक्त पाणीही काढून टाका. याने भातातील स्टार्च निघून जाईल.
6 / 9
वजन कमी करणाऱ्यांना सल्ला - जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर डाएटसोबतच एक्सरसाइजवरही लक्ष द्या. हे नेहमी लक्षात ठेवा की, कोणतीही एक गोष्ट करून तुम्ही वजन कमी करू शकत नाही. यासाठी तुम्हाला आहार, लाइफस्टाईल आणि एक्सरसाइजवर लक्ष द्यावं लागेल.
7 / 9
शिळा आणि पुन्हा गरम केल्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. ज्यामुळे पोटदुखी, उलटी होणे, जुलाब होणे, अपचनाचा त्रास अशा समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.
8 / 9
शिळ्या भाताचे सेवन वारंवार केल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होण्याचा धोका असतो. हा त्रास लहानांनाच नाही तर महिलांना आणि पुरूषांना सुद्धा होत असतो.
9 / 9
जर तुम्हाला योग्य पध्तीने भाताचं सेवन करायचं असेल तर एका तासाच्या आत थंड करून एका भांड्यात काढून ठेवा. भात थंड करण्यासाठी तुम्ही हवाबंद डब्याचा वापर सुद्धा करू शकता. उरलेला भात फ्रिजमध्ये ठेवत असताना फक्त १ दिवस ठेवावा. यापेक्षा अधिक दिवस फ्रिजमध्ये ठेवलेला भात जर तुम्ही खाल्लात तर आरोग्याचं नुकसान होऊ शकतं.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स