How to loss weight in easiest way
झटपट वजन कमी करण्यासाठी या ७ खास टीप्स, मग बघा कमाल... By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 11:39 AM1 / 8महिला आपली फिगर मेंन्टेन करण्याबाबात खूप जागरूक असतात. एक इंच सुध्दा वाढलेलं शरीर त्यांना सहन होत नाही. काही महिला सुरूवातीपासूनच बारीक असतात. परंतु गरोदरपणानंतर या स्त्रीयांचे शरीर वाढते. आणि बेढब दिसु लागतात.2 / 8अलीकडे वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उदयोग लोकं करत असतात. पण फारसा फरक दिसून येत नाही. जर तुमच्या शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होत नसेल. तर या काही खास उपायांनी वजन नक्की कमी होईल.3 / 8जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर टेंन्शन घ्यायचे काही कारण नाही. रोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाण्यात लिंबू आणि मध घालून प्या. असे केल्यास वजन नक्की कमी होईल.4 / 8दोन ग्लास पाण्यात धणे काहीवेळ भिजवून ठेवा. त्यानंतर ते पाणी उकळून घ्या. उकळत असताना पाणी अर्धे झाल्यानंतर गॅस बंद करा. नंतर ते पाणी गाळून घ्या आणि दिवसातून तीन ते चार वेळा हे पाणी प्यायाल्यास फरक दिसून येईल.5 / 8जास्त कार्बोहायेड्रेट असणाऱ्या पदार्थांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. साखर, बटाटा आणि तांदळामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायेड्रेट असते. यामुळे चरबी वाढते. असे चरबी वाढवणारे पदार्थ टाळा.6 / 8पपईचे सेवन केल्याने कंबरेवरची अतिरिक्त चरबी कमी होते. तसेच पपई खाल्ल्याने शरीरातील लठ्ठपणा कमी होतो. ताज्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश आहारात असावा. दररोज कोबीचे ज्यूस प्या. कोबीमध्ये चरबी कमी करणारे गुण असतात. यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म योग्य राहते.7 / 8वजन कमी करण्यासाठी योगा करणं हा चांगला मार्ग आहे. जर तुम्ही डायटिंग, जिम आणि इतर सगळे प्रयत्न करून थकला असाल तर तुम्ही योग नक्की करा. फिट आणि हेल्दी राहण्यासाठी योगसारखा दुसरा कोणताही उपाय नाही.8 / 8झोपण्यापूर्वी गरम पाण्यानं आंघोळ करावी. त्यामुळं चांगली झोप लागते. झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त फॅट बर्न होतं. झोपल्यानं शरीरातील हार्मोन कंट्रोल असतात, त्यामुळं सतत भूख लागत नाही आणि शरीरातील उर्जाही कमी होत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications