शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' पदार्थांमुळे चहाला येईल कधीही न विसरता येणारी टेस्ट, एकदा पिऊन तर बघा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 10:05 AM

1 / 7
हिवाळा सुरु झाल्याने सर्दी खोकला यांसारखे आजार मान वर काढत आहेत. अशा आजारांपासून आपला आणि आपल्या कुटूंबाचा बचाव करण्यासाठी काही घरगुती पदार्थच तुम्हाला मदत करु शकतात. सर्वसाधारणपणे चहा हा सगळ्यांच्या घरी प्यायला जातो. कारण चहा प्यायल्यानंतर ताजेतवाने झाल्यासारखे वाटतं. चहा प्यायल्यानंतर तरतरी येते.
2 / 7
चहा शरीरातील नसांमध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया दुर करते. आणि त्याचे कार्य चांगले करण्यासाठी योग्य प्रकारे काम करते. यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो. तसेच चहामुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर आराम मिळतो.
3 / 7
सकाळी चहा पित असताना जर चहात काही गोष्टीं घालून चहा तयार केला तर अनेक आजारांपासून बचाव करता येऊ शकतो.
4 / 7
चहात तुळशीची पानं घालावी. तुळशीच्या पानात औषधी गुणधर्म असतात. तुळशीतील हे औषधी गुणधर्म शरीरातील इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव करतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळस फायदेशीर ठरते. यामुळे सर्दी खोकला, कफ लवकर बरे होतात.
5 / 7
चहात लवंग घातल्याने शरीरातील विषाणू बाहेर पडण्यास मदत होते. तसेच लवंगाचे अनेक औषधीगुण आहेत. जे शरीरातील इन्फेक्शन दूर करतात.
6 / 7
आलं हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरलं जात. तसेच अनेक चहाप्रेमी आल्याचा चहा आर्वजून पितात. आल्याचा चहा प्यायल्याने शरीरातील कफ पातळ होतात. खोकला झाला असेल आल्याचा चहा गुणकारी ठरतो.
7 / 7
चहात हळद घालून प्यायल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं हळदीचे अनेक औषधी गुणधर्म आजारांपासून सामना करण्यासाठी हळद गुणकारी ठरते
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी