how many deaths have been caused by monkeypox
Monkeypox Virus : मंकीपॉक्सची भारतात एन्ट्री! आतापर्यंत किती लोकांचा मृत्यू?; जाणून घ्या, कितपत आहे धोका By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 4:13 PM1 / 9'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'नुसार, मंकीपॉक्सला वर्ल्ड हेल्थ इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत WHO ने MPOX ला वर्ल्ड हेल्थ पब्लिक इमर्जन्सी घोषित करण्याची ही दुसरी वेळ आहे. 2 / 9डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये व्हायरल इन्फेक्शन वाढल्यामुळे WHO ने ही घोषणा केली आहे. Mpox व्हायरस आता काँगोच्या शेजारील देशांमध्ये पसरला आहे. Mpox हा मंकीपॉक्स म्हणून ओळखला जाणारा संसर्ग आहे.3 / 9दोन वर्षांपूर्वी जेव्हा WHO ने MPox ला वर्ल्ड हेल्थ इमर्जन्सी घोषित केलं तेव्हा हा आजार जगभरात पसरू लागला. या आजाराचा प्रभाव त्या लोकांवर सर्वात जास्त दिसून आला ज्यांना काही लैंगिक आजारांनी ग्रासले आहे. 4 / 9डब्ल्यूएचओने रोग टाळण्यासाठी लोकांना जागरुक करण्यास सुरुवात केली. सध्या काँगोमध्ये एमपीओएक्सचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. आफ्रिकेत हा आजार भयावह रूप धारण करत आहे. 5 / 9लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. लोकांना जागरूक केले जात आहे. काँगोमध्ये २०२३ मध्ये आतापर्यंत २७ हजार रुग्ण आढळले आहेत. तेथे ११०० रुग्णांचा मृत्यू झाला होता. 6 / 9Mpox ची लागण झालेले बहुतेक जण लहान मुलं आहेत. गरोदर स्त्रिया आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना एमपीओएक्सचा सर्वाधिक फटका बसतो. 7 / 9कांगोमध्ये Mpox चे दोन प्रकार झपाट्याने पसरत आहेत. अशा वेगळ्या प्रवासाशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी देश पूर्णपणे तयार आहे आणि संभाव्य जोखीम रोखण्यासाठी आणि कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 8 / 9केंद्र सरकारने सर्व राज्यांसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच, कोरोना व्हायरसच्या आव्हानादरम्यान राज्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.9 / 9नुकत्याच झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत हे समोर आलं आहे की मंकीपॉक्समध्ये सामान्यतः दोन ते चार आठवड्यांचा संसर्ग कालावधी असतो. संक्रमित व्यक्तीशी दीर्घकाळापर्यंत जवळचा संपर्क असल्यास या व्हायरसची लागण होऊ शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications