how much coffee you can consume in days to avoid health problems because of caffeine
आरोग्य सांभाळा! रोज जास्त कप कॉफी पीत असाल तर थांबा; 'या' आजारांचा गंभीर धोका By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 12:55 PM1 / 13कॉफीचं सेवन हा आजच्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. यामध्ये असलेले कॅफिन तुम्हाला त्वरित ऊर्जा देते. अशा परिस्थितीत लोक थकवा आणि प्रेशरच्या सामना करण्यासाठी त्याचं भरपूर सेवन करू लागले आहेत. 2 / 13कॉफी मर्यादित प्रमाणात सेवन करणं आरोग्यासाठी चांगले असले तरी, जर तुम्ही ती जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर ते तुमच्या आरोग्याला खूप हानी पोहोचवू शकते. रोज जास्त कप कॉफी प्यायल्याने शरीराला हानी पोहोचते.3 / 13तज्ञांच्या मते, प्रौढांनी दररोज 400 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिन घेऊ नये. सरासरी एक कप कॉफीमध्ये सुमारे 95 मिलीग्राम कॅफिन असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही दिवसातून 4 कप कॉफी प्यायली तर ते पुरेसे आहे. यापेक्षा जास्त कॉफी घेणे तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. 4 / 134-6 वर्षांच्या मुलांसाठी हे प्रमाण 45 मिलीग्राम आहे, 7-12 वर्षांच्या मुलांसाठी हे प्रमाण 70 मिलीग्राम आहे. मुलं ते अभ्यासासाठी जागं राहावं म्हणून कॉफीचे सेवन करतात. त्यांनी फक्त दोन कप कॉफी म्हणजेच 100 ते 200 मिलीग्रॅम कॅफिन घेतले पाहिजे.5 / 13कॉफी प्यायल्यानंतर, कॅफिन केवळ 15 मिनिटांत तुम्हाला ऊर्जा देण्यास सुरुवात करते. शरीराच्या आत पोहोचण्यापेक्षा शरीरातून बाहेर पडण्यासाठी जास्त वेळ लागतो. शरीरातील अर्धे कॅफिन काढून टाकण्यासाठी सुमारे तीन ते पाच तास लागतात. 6 / 1375 टक्के कॅफिन काढून टाकण्यासाठी सुमारे सहा तास लागतात. 10 तासांनंतर शरीरातून कॅफिन पूर्णपणे काढून टाकले जात नाही, ज्यामुळे तुम्ही अनेक रोगांना सहज बळी पडू शकता.7 / 13जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर असेल तर जास्त प्रमाणात कॅफीन पिणे तुमच्या शरीरासाठी खूप धोकादायक ठरू शकतं. कॉफीमध्ये असलेले कॅफिन तुम्हाला त्वरित ऊर्जा देते. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर यामुळे तुमच्या ब्लड प्रेशर काऊंट लगेचच वेगाने वाढेल.8 / 13मर्यादेत कॉफीचे सेवन करणे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, जर तुम्ही जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर ते घातक आहे. शरीराचे तापमान वाढते आणि रक्तवाहिन्यांनाही वेगाने काम करावे लागते. यामुळे हृदयावर दाब येतो आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.9 / 13कॉफीचे सेवन केल्याने तुम्हाला झटपट ऊर्जा मिळते, पण त्यामुळे पोटाशी संबंधित विकारही होतात. जास्त कॉफी प्यायल्यास पोटातून गॅस्ट्रिक हार्मोन्स जास्त बाहेर पडतात. त्यामुळे गॅस, एसिडीटी, जुलाब यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.10 / 13जर तुम्हाला झोपायला त्रास होत असेल तर तुम्ही जास्त कॉफी पिऊ नये. कॉफीमध्ये असलेले कॅफिन झोप कमी करते. जर तुम्हाला आधीच निद्रानाशाचा त्रास होत असेल तर ही परिस्थिती आणखी बिघडू शकते.11 / 13कॉफीचे जास्त सेवन करणे देखील हाडांसाठी फायदेशीर मानले जात नाही. जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन केल्याने हाडांचा आजार ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका वाढू शकतो.12 / 13जर तुम्हाला कॉफी प्यायची असेल तर सकाळ ही सर्वोत्तम वेळ आहे. खरं तर, सकाळी उठल्यानंतर आपल्या उर्जेची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत तुम्ही कॉफी प्यायल्यास तुम्हाला झटपट ऊर्जा मिळेल आणि तुमचे शरीर सक्रिय होईल. 13 / 13दुपारनंतर म्हणजे चारच्या सुमारास कॉफीचे सेवन करू शकता. मात्र रात्री उशिरा कॉफी पिणे टाळा. असे न केल्यास निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो. याशिवाय मोठ्या आकाराच्या कपमध्ये कॉफी कधीही घेऊ नका. कॅफिनचे प्रमाणही वाढेल. अशा परिस्थितीत, सरासरी आकाराच्या कपमध्येच कॉफी प्या. आणखी वाचा Subscribe to Notifications