How much water should you drink every day?
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं? By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 4:50 PM1 / 9आपल्या शरीराचे वजनात जवळपास ६० पाण्याचा समावेश आहे. शरीरातील बहुतांश क्रियांसाठी पाण्याची गरज असते.2 / 9पेशींपर्यंत पोषक घटक पोहोचवणे, अनावश्य पदार्थ बाहेर टाकणे, जेवण पचवणे अशा क्रियांसाठी पाणी लागते.3 / 9शरीरात पाणी कमी झाले, तर डिहायड्रेशन, गोंधळ आणि चक्कर येण्यासारख्या समस्या येऊ शकतात.4 / 9त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी प्यायलाच हवे. शरीराला किती पाणी हवे, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. यात वजन, शरीराचा आकार, तापमान, शारीरिक हालचाली आदी.5 / 9संशोधनानुसार, एका व्यक्तीने दिवसभरात ८ ग्लास पाणी प्यायला हवे. पुरुषांनी तीन लिटर पाणी प्यायला हवे. महिलांनी दिवसभरात २ लिटर पाणी प्यायला हवे आणि मुलांनी दिवसभरात ६ ते ८ कप पाणी प्यायला हवे. 6 / 9गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी दिवसभरात १० ते १२ ग्लास पाणी प्यायला हवे.7 / 9तुम्ही जर शारीरिक हालचाली जास्त करत असाल आणि उष्ण वातावरणात राहत असाल, तर तुम्ही जास्त पाणी प्यायला हवे. किडनी किंवा ह्रदयांचा आजार असेल, तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाणी प्यायला हवे. 8 / 9तुमच्या तोंड आणि घसा लवकर कोरडा पडत असेल किंवा लघवीचा रंग पिवळा दिसत असेल, तर तुमचे शरीर डिहायड्रेड झाले आहे. 9 / 9शरीराच्या सर्व भागांना कार्यरत ठेवण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर लगेच २ ग्लास पाणी प्यायला हवे. पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवणाआधी अर्धा तास आधी १ ग्लास पाणी प्या. आणखी वाचा Subscribe to Notifications