शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccine: महिलांसाठी लस कितपत सुरक्षित? मासिक पाळी, गर्भधारणा, दुष्परिणाम...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 8:42 AM

1 / 15
कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेने देशात गेल्या काही दिवसांत चांगलाच वेग घेतला आहे. मात्र, लसीचा डोस घेण्यात महिलावर्ग काहीसा पिछाडीवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लसीमुळे शरीरावर दुष्परिणाम होतो, असा महिलावर्गात प्रचार होत असल्याचे त्यातून अधोरेखित झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे केवळ भारतीय महिलांमध्येच असा समज आहे, असे नाही तर इतरत्रही हेच चित्र आहे.
2 / 15
लसीकरणामुळे गर्भधारणेवर परिणाम होतो. मासिक पाळीचे चक्र अनियमित होते. आरोग्यावर दुष्परिणाम होतो.
3 / 15
लस घेतल्याने गर्भधारणा होण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो, यासंदर्भातील कोणतेही वैद्यकीय पुरावे उपलब्ध नाहीत.
4 / 15
फायझरने केलेल्या अभ्यासात कोरोनाप्रतिबंधक लस दिलेल्या आणि न दिलेल्या महिलांमध्ये गर्भधारणेचे प्रमाण समसमानच होते, असे निदर्शनास आले.
5 / 15
गर्भधारणा होण्याची शक्यता असलेल्या महिलांनी लस घेऊ नये, असे कोणत्याही वैद्यकीय संस्थेने स्पष्ट केलेले नाही.
6 / 15
लसीकरणात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करणारे पत्र अलीकडेच राष्ट्रीय महिला आयोगाने सर्व राज्यांना पाठवले.
7 / 15
गर्भधारणेदरम्यान कोरोना झाल्यास प्री-मॅच्युअर प्रसूती होण्याची शक्यता अधिक.
8 / 15
कोरोनाबाधित गर्भवती महिलांना उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा स्थूलपणा असेल तर प्रसूतीवेळी धोका निर्माण होऊ शकतो.
9 / 15
लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, असे जागतिक आरोग्य संघटनेनेही स्पष्ट केले आहे.
10 / 15
प्रसूतीवेळी निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीपासून बचाव करण्यासाठी महिलांनी कोरोनाप्रतिबंधक लस घेणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
11 / 15
गर्भवती असताना लस घेणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा भारतीय वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
12 / 15
देशात ५० कोटी ४५ लाख ९७ हजार ९८२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर ५७.६१ कोटी कोरोना लसींचे डोस नागरिकांना देण्यात आले.
13 / 15
गेल्या चोवीस तासांत केरळमध्ये सर्वाधिक २०,२२४ नवे कोरोना रुग्ण सापडले. त्या पाठोपाठ महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो. केरळने अधिक दक्षता घ्यावी, अशी सूचना केंद्राने दिली आहे.
14 / 15
जगभरात कोरोनाचे २१ कोटी १६ लाख रुग्ण आहेत. त्यापैकी १८ कोटी ९४ लाख रुग्ण बरे झाले.
15 / 15
या संसर्गामुळे ४४ लाख १३ हजार जणांचा मृत्यू झाला व १ कोटी ७८ लाख जणांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेत ३ कोटी ८३ लाख कोमहिलांसाठी लस कितपत सुरक्षित?
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस