शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Cholesterol Diet: या घरगुती उपायाने कमी होणार कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी सुरू करा सेवन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 2:15 PM

1 / 7
How To Decrease Bad Cholesterol: शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं नुकसानकारक ठरू शकतं. कारण यामुळे आर्टरीजमध्ये फॅट जमा होऊ लागतं. ज्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊ लागते. हेच कारण आहे की, जास्तीत जास्त हेल्थ एक्सपर्ट अशा स्थितीपासून बचाव करण्यासाठी हेल्दी डाएट घेण्याचा सल्ला देतात.
2 / 7
बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एका घरगुती उपायाची मदत घेतली जाऊ शकते. हा उपाय म्हणजे आलं. आल्याचा वापर चहा आणि पदार्थांची चव वाढवण्यासाठी जास्त प्रमाणात केला जातो. आयुर्वेदातही याने अनेक फायदे सांगितले आहेत. तसेच आल्याचा वापर बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही केला जाऊ शकतो.
3 / 7
प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखील वत्स यांनी सांगितलं की, कोलेस्ट्रॉल आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे ज्याने आपली त्वचा, केस आणि मेंदू हेल्दी राखण्यास मदत मिळते. कोलेस्ट्रॉल तयार करण्याचं काम लिव्हर करतं. आल्याबाबत सांगायचं तर याच्या मदतीने शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात, जे लिव्हर फंक्शनसाठी गरजेचं असतं. आल्याच्या सेवनाने रक्तनलिका मोकळ्या होतात आणि हृदयरोग होण्याचा धोकाही कमी राहतो. चला जाणून घेऊ कसं करावं याचं सेवन...
4 / 7
आल्याचं पाणी - जर तुम्ही आल्याचं पाणी प्यायलात तर शरीराला याचा अर्क मिळेल. याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळेल. यासाठी तुम्ही जेवण झाल्यानंतर अर्धा कप आल्याचं पाणी प्यावं. हे तयार करण्यासाठी आल्याचे काही तुकडे एका भांड्यात टाका आणि उकडून घ्या. पाणी थंड झालं की प्या.
5 / 7
आलं - लिंबाचा चहा - आलं तर तसंही आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. जर त्याने थोडा लिंबाचा रस घातला तर फायदा दुप्पट होईल. जेव्हा तुम्ही तेल आणि मसाल्याचे पदार्थ जास्त खाता तेव्हा बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. तेच आलं-लिंबूचं सेवन केलं तर बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळेल.
6 / 7
आल्याचं थेट सेवन - जर तुम्ही जास्त तेल किंवा मसाल्याचे पदार्थ सतत खात असाल तर याने बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. ज्याने तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका जास्त राहतो. अशात तुम्ही कच्च आलंही चघळू शकता. यात जास्त मेहनतीही करावी लागणार नाही आणि कोलेस्ट्रॉलही वेगाने कमी होईल.
7 / 7
आल्याचं पावडर - आल्याच्या पावडरचं सेवन करणंही सोपं आहे. हे तुम्ही पाणी किंवा जेवणातही मिक्स करून सेवन करू शकता. हे पावडर तुम्ही रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतरही खाऊ शकता. याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते.
टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स