How to Lose Face Fat: 8 Effective Tips
चेहऱ्यावरील चरबी कमी करण्याचे सोपे उपाय, फॉलो करा मग बघा कमाल By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 2:56 PM1 / 8वजन कमी करणं हे काही सोपं काम नाही. अलिकडच्या लाइफस्टाईलमुळे शरीरावर चरबी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशात लोक वेगवेगळे उपाय करतात. पण त्यांना काही फायदा होताना दिसत नाही. त्यात चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर ही गोष्ट आणखीनच कठीण आहे.2 / 8चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी त्यांना योग्य ते उपाय माहीत नसतात. सूजलेला किंवा चरबीमुळे फुगलेला चेहरा फारच बेढब दिसतो. अशात चेहऱ्यावरील सूज कशी कमी करायची? असा प्रश्न उभा राहतो. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर काही खास उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.3 / 8फेशिअल एक्सरसाइज - चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी फेशिअल एक्सरसाइज केली जाते. वाढत्या वयासोबत चेहऱ्याची त्वचा ताणलेली किंवा तजेलदार दिसण्यासाठीही फेशिअल एक्सरसाइज फार फायदेशीर मानली जाते. 4 / 8काही रिसर्चमधून समोर आले आहे की, जर रोज फेशिअल एक्सरसाइज केली तर चेहऱ्यावरील चरबी कमी केली जाऊ शकते. फेशिअल एक्सरसाइज सामान्यपणे तोंडात हवा भरून ती आत-बाहेर करणे किंवा वर-खाली करणे अशी केली जाते. मात्र, ही एक्सरसाइज फिटनेस एक्सपर्टच्या सल्ल्यानेच करावी.5 / 8कार्डिओ एक्सरसाइज - शरीरात जेव्हा अधिक फॅट असतं, तेव्हा ते चेहऱ्यावरही दिसतं. जास्त लठ्ठपणा असलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरही चरबी असते. फिटनेस एक्सपर्टनुसार, फॅट बर्न करणारी एक्सरसाइज करून चेहऱ्यावरील फॅट कमी होतं. कार्डिओ एक्सरसाइज आणि एरोबिक एक्सरसाइजकडे फॅट बर्न करणाऱ्या एक्सरसाइज म्हणून पाहिलं जातं.6 / 8एक्सपर्ट्सनुसार, एक्सरसाइज हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी किंवा वेगवान करण्यास मदत करते. ज्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. तुम्हाला फॅट बर्न करायचं असेल तर कार्डिओ एक्सरसाइज रोज करू शकता. यात प्रामुख्याने धावणे, सायकलिंग, स्वीमिंग यांचा समावेश असतो.7 / 8पाणी प्या - वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं फायद्याचं ठरतं. वेगवेगळ्या डाएट एक्सपर्ट्ससोबतच वेगवेगळ्या रिसर्चमधूनही हेच सांगण्यात आलं आहे. जर तुम्हाला चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर दिवसभरात भरपूर पाण्याचं सेवन करत रहावं.8 / 8एका रिसर्चनुसार, जर सकाळी नाश्त्याआधी रोज अधिक पाण्याचं सेवन केलं तर १३ टक्के जास्त कॅलरी बर्न करता येऊ शकतात. त्यामुळे तुमच्या हे लक्षात असायला पाहिजे की, डेली डाएटमध्ये पाण्याचंही प्रमाण योग्य असावं. आणखी वाचा Subscribe to Notifications