शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लहान मुलांचं कोरोना लसीकरण झालं नसल्यास पाल्यांनी अशी घ्यावी काळजी, वेळीच घ्या खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 6:53 PM

1 / 10
देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस (COVID-19) चा धोका निर्माण झाला आहे. सध्या राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सरकारसह सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
2 / 10
अर्थात, लसीकरणानंतर (Covid Vaccination) बहुतेक लोक कोरोनाचे परिणाम टाळू शकतात. मात्र, लहान मुलांवर कोरोनाचे संकट कायम आहे.
3 / 10
अशा परिस्थितीत मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे (Corona guidelines) लक्ष देणे आवश्यक झाले आहे.
4 / 10
कोणत्या गोष्टींची खबरदारी घेऊन तुम्ही मुलांना कोरोनाच्या संकटापासून वाचवू शकता, त्याविषयी जाणून घेऊया.
5 / 10
कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन - मुलांना घराबाहेर जाण्यापूर्वी कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला द्या. विशेषतः शाळेत, मुलांना सामाजिक अंतर राखण्यास सांगा आणि वेळोवेळी हँड सॅनिटायझर लावण्याची सवय लावा.
6 / 10
आरोग्य तपासणी - मुलांना कोरोना विषाणूपासून वाचवण्यासाठी त्यांची आरोग्य तपासणी आणि संपूर्ण शरीर तपासणी वेळेवर करा. यामुळे तुम्ही मुलांना केवळ कोरोनापासून सुरक्षित ठेवू शकत नाही, तर त्यांच्या आरोग्याशी संबंधित आजार अगदी सुरुवातीस सहज शोधून त्यावर उपचार करू शकता.
7 / 10
लस महत्त्वाची आहे - अर्थात, 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी लस अद्याप आलेली नाही. तथापि, मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि फ्लूशी लढण्यासाठी लसी अनेक रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत.
8 / 10
मुलांना त्यांच्या वयोगटानुसार सर्व लसी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना कोरोनाविरुद्ध लढण्याची ताकद मिळेल.
9 / 10
आहाराची काळजी घ्या - मुलांच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध फळे आणि भाज्यांचा समावेश करण्यास विसरू नका. तसेच व्हिटॅमिन सी आणि लोह असलेल्या गोष्टींना आहारात घ्या.
10 / 10
घालण्याचा सल्ला द्या - जर तुमचे मुल 12 वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल किंवा त्याचे अद्याप लसीकरण झालेले नसेल, तर त्याला मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू देऊ नका. तसेच, मुलांच्या चांगल्या सुरक्षेसाठी केवळ उत्तम दर्जाचे मास्क खरेदी करा.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स