hydrating fruits to get rid of dehydration
उन्हाळ्यात 'कूल' राहायचंय? आहारात 'या' फळांचा करा समावेश By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 11:22 AM1 / 5उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तापमानात वाढ झाल्याने आजारी पडण्याचा धोकाही अधिक असतो. गरम होत असल्याने शरिराला पाण्याची आवश्यकता असते. मात्र कमी प्रमाणात पाणी प्यायल्यास डिहायड्रेशनचा त्रास होतो. फळांचा समावेश आपल्या आहारात केल्यास यापासून बचाव करता येतो. या फळांबाबत जाणून घेऊया. 2 / 5पपईमध्ये अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण अधिक असल्याने ते शरिरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पपई ही शरिरातील पाण्याची कमतरता भरून काढते. त्यामुळे हायड्रेशनचा धोका हा कमी असतो. पपईमध्ये 86 टक्के पाणी असतं. 3 / 5सफरचंदामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन आणि फायबरसारखे पोषक घटक असतात. यामुळे इम्यून सिस्टम योग्य ठेवण्यास मदत होते. तसेच यामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रमाणामुळे शरिराचे स्वाथ्य उत्तम राखण्यास मदत होते. 4 / 5संत्र हे शरिरासाठी अत्यंत उपयुक्त फळ असून त्यामध्ये व्हिटॅमिन्स सी असतं. तसेच संत्र्यामध्ये 80 ते 85 टक्के पाण्याचे प्रमाण असते जे शरिराला निरोगी ठेवण्यास मदत करतं. 5 / 5उन्हाळ्यात टरबूज खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. टरबूजमध्ये झिंक, कॉपर, मॅग्नेशियम, सेलेनियम, कोलिन आणि व्हिटॅमिन सारखे पोषक घटक असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications